Chinmayee Sumit : '...म्हणून मी नमस्कारानंतर जय भीम म्हणते', मराठमोळी चिन्मयी सुमीत थेटच बोलली
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Chinmayee Sumit : आपल्या भाषणात बोलताना चिन्मयी नेहमीच नमस्कारानंतर 'जय भीम' का बोलते असा प्रश्न अनेकांना पडला होता. अखेर चिन्मयीनं या प्रश्नाचं उत्तर दिलंय.
advertisement
1/7

मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत नेहमीच तिचं मत स्पष्टपणे मांडत आली आहे. मग ते मराठी भाषेसंदर्भात असोत, मराठी शाळांविषयी असोत किंवा एखाद्या सिनेमाविषयी असोत. अनेक सामाजिक मुद्द्यांवरही चिन्मयी बिनधास्तपणे बोलताना दिसते. चिन्मयीचं असंच एक बिनधास्त वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे.
advertisement
2/7
आपल्या भाषणात बोलताना चिन्मयी नेहमीच नमस्कारानंतर 'जय भीम' बोलते. यावरून तिला अनेक प्रश्न विचारण्यात येतात.
advertisement
3/7
नुकताच पार पडलेला अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचा 13 वा महाराष्ट्र राज्य अधिवेशनात चिन्मयीनं ती जय भीम असं का म्हणते? ते बोलण्यामागचा नेमका अर्थ काय? हे सांगितलं.
advertisement
4/7
चिन्मयी म्हणाली, "मी जय भीम म्हणते नेहमी नमस्कारानंतर, मला खूप जण विचारतात की तुम्ही जय भीमवाल्या आहात का? तुम्ही त्यांच्यातल्या आहात का?"
advertisement
5/7
"तर मी त्यांच्यातली आहे. मी आंबेडकरांची आहे. लोक वेगवेगळ्या जणांचे फॅन्स असतात तशी मी आंबेडकरांची फॅन आहे. मला असं वाटतं की भारताल्या प्रत्येक भगिनीला जय भीम म्हणावसं वाटलं पाहिजे."
advertisement
6/7
चिन्मयी पुढे म्हणाली, "आपण सर्व जनवादी महिला संघटनेच्या कार्यकर्त्या कॉम्रेड आहात. मला वाटतं जनवादी म्हणजे लोकशाही आणि माणूस म्हणून आपल्याला दर्जा आहे असं मानून महिला संघटना चालवणारे लोक, समानतेवर आधारित समाज असावा असं स्वप्न बघणाऱ्या महिला या प्रथम माणूस आहेत याची आठवण करून देणारी ही संघटना आहे."
advertisement
7/7
"आपल्या सर्व महिलांना माणसाचा दर्जा जो दिला तो आपल्या राज्यघटनेने आणि त्या राज्यघटनेचे घटनाकार म्हणून मला असं वाटतं की बाबासाहेबांप्रतीची कृतज्ञता माझ्या आयुष्यात माझ्या प्रत्येक नमस्कारनंतर व्यक्त व्हावी म्हणून मी नेहमी जय भीम म्हणते."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Chinmayee Sumit : '...म्हणून मी नमस्कारानंतर जय भीम म्हणते', मराठमोळी चिन्मयी सुमीत थेटच बोलली