धर्मेंद्र यांची ही इच्छा अधुरीच राहिली, प्रसिद्ध दिग्दर्शकाने व्यक्त केली खंत
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Dharmendra : धर्मेंद्र यांची एक इच्छा अधुरीच राहिली आहे. 'ही-मॅन'च्या निधनानंतर प्रसिद्ध दिग्दर्शकाने खंत व्यक्त केली आहे.
advertisement
1/7

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी नुकतंच दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्यासोबतच्या शेवटच्या भेटीबाबत भाष्य केलं आहे. अनिल शर्मा यांच्याकडे धर्मेंद्र यांनी आपली एक खास इच्छा व्यक्त केली होती.
advertisement
2/7
अनिल शर्मा यांनी सुपरस्टार धर्मेंद्र यांच्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे आणि त्यांच्याशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते.
advertisement
3/7
हुसैन जैदी यांच्या युट्यूब चॅनेलवरील मुलाखतीत अनिल शर्मा यांनी धर्मेंद्र यांच्यासोबतची शेवटची भेट सांगितली. त्या वेळी धर्मेंद्र यांनी आपलं पहिलं प्रेम असलेल्या सिनेमात पुन्हा एकदा परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. अनिल शर्मा यांनी त्यांच्यासाठी एखादा ताकदवान आणि संस्मरणीय रोल लिहावा, अशी त्यांची इच्छा होती.
advertisement
4/7
धर्मेंद्र यांच्यासोबतच्या शेवटच्या भेटीची आठवण सांगताना अनिल शर्मा म्हणाले, "मी सप्टेंबरमध्ये बॉबी देओलला भेटायला त्यांच्या घरी गेलो होतो. धर्मेंद्रजी तिथेच बसले होते. बरेच लोक त्यांना भेटायला येत होते आणि ते सर्वांशी बोलत होते. मीही त्यांना भेटलो. त्यांनी मला मिठी मारली आणि माझी विचारपूस केली".
advertisement
5/7
अनिल शर्मा म्हणाले,"धर्मेंद्र यांनी मला सांगितले,'अनिल बेटा, माझ्यासाठी एक चांगला रोल लिही. मला अजून काहीतरी वेगळं करायचं आहे. कॅमेराशिवाय मी राहू शकत नाही. तो मला बोलावतोय. काहीतरी कर, एखादा चांगला रोल लिही".
advertisement
6/7
अनिल शर्मा पुढे म्हणाले,"धर्मेंद्रजी यांनी मला हे तीन वेळा सांगितलं होतं. मी त्यांना वचन दिलं होतं की मी त्यांच्या साठी रोल लिहीन. मला कल्पनाही नव्हती की काही महिन्यांतच ते आपल्यात नसतील. तीच आमची शेवटची भेट ठरली. ते 90 वर्षांचे होणार होते, पण बघा ना त्यांचा उत्साह! त्यांना सिनेमावर किती प्रेम होतं. तो त्यांच्यासाठी व्यवसाय नव्हता, तो त्यांचा जीव होता".
advertisement
7/7
देओल कुटुंबीयांनी नुकतंच हरिद्वार येथे धर्मेंद्र यांच्या अस्थींचे विसर्जन केले. धर्मेंद्र यांचे नातू करण देओल यांनी अस्थी विसर्जित केल्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
धर्मेंद्र यांची ही इच्छा अधुरीच राहिली, प्रसिद्ध दिग्दर्शकाने व्यक्त केली खंत