गोविंदाला धर्मेंद्र यांनी मारली होती कानाखाली? चित्रपटाच्या सेटवरच तुफान राडा! हेमा मालिनी ठरल्या होत्या कारण
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Dharmendra slapped Govinda : एक किस्सा ९० च्या दशकात गाजला होता, जेव्हा धर्मेंद्र यांनी रागाच्या भरात सुपरस्टार गोविंदाला कानाखाली मारल्याची चर्चा सिनेसृष्टीत पसरली होती. या वादाच्या केंद्रस्थानी होत्या, धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनी.
advertisement
1/9

मुंबई: बॉलिवूडमध्ये आपल्या रुबाबदार आणि मनमिळावू स्वभावासाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र शांत असले तरी, जेव्हा त्यांच्या कुटुंबाचा किंवा सन्मानाचा प्रश्न येतो, तेव्हा 'शोले'च्या 'वीरू'चा पारा चढायला वेळ लागत नाही.
advertisement
2/9
असाच एक किस्सा ९० च्या दशकात गाजला होता, जेव्हा धर्मेंद्र यांनी रागाच्या भरात सुपरस्टार गोविंदाला कानाखाली मारल्याची चर्चा सिनेसृष्टीत पसरली होती. या वादाच्या केंद्रस्थानी होत्या, धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनी.
advertisement
3/9
हा किस्सा त्या वेळेचा आहे, जेव्हा गोविंदा बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर होता. गोविंदाला महेश भट्ट दिग्दर्शित 'आवारागी' या चित्रपटासाठी साईन करण्यात आले होते. विशेष म्हणजे, या चित्रपटाची निर्माती स्वतः हेमा मालिनी होत्या. गोविंदाच्या विरुद्ध मीनाक्षी शेषाद्रीची निवड झाली होती.
advertisement
4/9
इंडिया.कॉमच्या रिपोर्टनुसार, कथानकात काही बदल करून निर्मात्यांनी अचानक अनिल कपूरला चित्रपटात घेण्यात आले. हा बदल गोविंदाला कळताच तो खूप नाराज झाला.
advertisement
5/9
दुसऱ्या अभिनेत्याच्या एंट्रीमुळे गोविंदाने चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला. यामुळे चित्रपटाच्या प्रोडक्शन टीमचे वेळापत्रक आणि आर्थिक गणिते पूर्णपणे बिघडली.
advertisement
6/9
परिस्थिती हाताळण्यासाठी आणि हेमा मालिनींना मदत करण्यासाठी धर्मेंद्र यांनी मध्यस्थी करण्याचे ठरवले आणि त्यांनी गोविंदाला समजावण्याची जबाबदारी घेतली. रिपोर्टनुसार, धर्मेंद्र यांनी गोविंदाला भेटण्यासाठी एक प्रायव्हेट मीटिंग ठेवली.
advertisement
7/9
धर्मेंद्र यांनी खूप शांतपणे गोविंदाला त्याचा निर्णय बदलण्याची विनंती केली, पण गोविंदा त्याच्या भूमिकेवर ठाम राहिला. गोविंदाचा हा हट्ट धर्मेंद्र यांना सहन झाला नाही आणि रागाच्या भरात त्यांनी कथितरित्या गोविंदाला थप्पड मारली.
advertisement
8/9
हा किस्सा मीडियामध्ये वेगाने पसरला असला तरी, धर्मेंद्र यांनी या सर्व बातम्यांना केवळ अफवा असल्याचे सांगून फेटाळून लावले होते. आजही गोविंदा आणि धर्मेंद्र यांचे नाते चांगले आहे.
advertisement
9/9
नुकतेच धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असताना, गोविंदा त्यांची विचारपूस करण्यासाठी ब्रीच कँडीमध्ये पोहोचला होता. यावरून दोघांमधील संबंध आजही चांगले असल्याचे दिसते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
गोविंदाला धर्मेंद्र यांनी मारली होती कानाखाली? चित्रपटाच्या सेटवरच तुफान राडा! हेमा मालिनी ठरल्या होत्या कारण