TRENDING:

Girija Oak : साडी प्रिया बापटची, फेमस झाली गिरीजा ओक; अखेर त्या व्हायरल ब्लू साडीचं सीक्रेट आलं समोर

Last Updated:
Girija Oak worn blue saree belonged to Priya Bapat : अभिनेत्री प्रिया बापटची साडी नेसून गिरीजा ओक थेट नॅशनल क्रश बनली. गिरीजाच्या त्या ब्लू साडीचं सीक्रेट अखेर सर्वांसमोर आलं.
advertisement
1/8
साडी प्रिया बापटची, फेमस झाली गिरीजा; अखेर त्या व्हायरल ब्लू साडीचं सीक्रेट समोर
मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक गेली अनेक वर्ष मराठी मनोरंजन विश्वात काम करतेय. जाहिरात क्षेत्रात गिरीजा ओकनं विशेष नाव कमावलं. अनेक मराठी, तसंच गुजराती नाटक तसंच सिनेमांमध्ये गिरीजानं काम केलं आहे. गिरीजाच्या कामाची पोचपावती तिला वेळोवेळी प्रेक्षकांकडून मिळत गेली पण त्या एका साडीनं गिरीजा एका रात्रीत नॅशनल क्रश बनली.
advertisement
2/8
एका साध्याशा मुलाखतीत तिनं नेसलेली निळ्या रंगाची साडी इतकी लोकप्रिय झाली की तिचे फोटो देशभरात व्हायरल झाले. गिरीजाला न्यू नॅशनल क्रश म्हणून ओळख मिळाली.  सोशल मीडियावर सतत गिरीजाच्या त्या निळ्या साडीची चर्चा होऊ लागली.
advertisement
3/8
पण तुम्हाला माहितीये का ती निळी साडी गिरीजाची नव्हतीच. ती साडी मराठी अभिनेत्री आणि प्रियाची अत्यंत जवळची मैत्रिण प्रिया बापट हिची होती. ऐकून शॉक झालात! गिरीजानं स्वत:च तिच्या ब्लू साडीमागचं सीक्रेट अखेर सांगून टाकलं. साडी प्रिया बापटची होती पण फेमस मात्र गिरीजा ओक झाली.
advertisement
4/8
गिरीजा ओकने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या निळ्या साडीचं सीक्रेट सांगितलं. प्रियानं नेसलेली ती निळी साडी तिच्या वैयक्तिक कलेक्शनमधील नव्हती.  ही साडी अभिनेत्री प्रिया बापट आणि तिची बहीण श्वेता यांच्या SaiVenchi या ब्रँडकडून आली होती.
advertisement
5/8
गिरीजाने सांगितलं की, तिला एका शूटसाठी खास साडी हवी होती. त्यावेळी तिनं प्रियाला फोन केला आणि 'मी साडी वापरीन आणि परत देईन, त्यावर आपण कोलाबरेशनमध्ये पोस्टही करूया', असं सांगितलं. त्यानंतर प्रियाची बहिण श्वेताने गिरीजाला अनेक साड्या पाठवल्या. त्यातली ही स्काय ब्लू रंगाची लिनन साडी गिरीजानं निवडली.
advertisement
6/8
गिरीजाने सांगितलं, "आम्हाला वाटलंच नव्हतं की ही साडी इतकी व्हायरल होईल. मी तिच्या इतरही साड्याही अनेकदा नेसल्या होत्या. पण हीच साडी लोकांच्या इतकी लक्षात राहील असं वाटलं नव्हतं."
advertisement
7/8
जरी गिरीजाने ही साडी विकत घेतली नव्हती, तरी तिचं या साडीशी खास नातं तयार झालं. तिनं श्वेताला सांगितलं की तिला ती साडी काही काळ स्वतःकडेच ठेवायची आहे. त्यावर श्वेताने ती साडी गिरीजाला गिफ्ट म्हणून दिली.
advertisement
8/8
आज ही निळी साडी गिरीजा ओकच्या फॅशनपेक्षा जास्त मैत्रीची आठवण बनली आहे. निळ्या साडीमुळे गिरीजाला एक नवी ओळख मिळाली. 'या निमित्तानं लोकांपर्यंत माझं काम पोहोचत असेल, लोकांनी मी नव्याने कळत असेल तर मी आनंदी आहे', अशी प्रतिक्रिया नॅशनल क्रश झाल्यानंतर गिरीजा ओकनं दिली होती.  
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Girija Oak : साडी प्रिया बापटची, फेमस झाली गिरीजा ओक; अखेर त्या व्हायरल ब्लू साडीचं सीक्रेट आलं समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल