गिरीजा ओकची फक्त निळी साडीच होतेय व्हायरल, पण अभिनेत्रीकडे 400 साड्यांचं कलेक्शन, किंमत लाखोंच्या घरात
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Girija Oak Saree Collection : निळ्या साडीतली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री गिरीजा ओक रातोरात 'नॅशनल क्रश' झाली. अभिनेत्रीला साड्यांची प्रचंड आवड आहे.
advertisement
1/7

निळ्या साडीतली गिरीजा ओक रातोरात 'नॅशनल क्रश' झाली. पण मराठमोळी गिरीजा ओक आपल्या सुंदर साड्यांच्या कलेक्शनमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्याकडे 400 साड्या असल्याचं सांगितलं आहे. तसेच या साड्यांची किंमत लाखोंमध्ये आहे. तर काही साड्या या 50 वर्ष जुन्या आहेत.
advertisement
2/7
नॅशनल क्रश गिरिजा ओक सध्या ‘परफेक्ट फॅमिली’ या वेब शोमुळे चर्चेत आहे. नुकतंच तिने एका मुलाखतीत आपलं साड्यांचा कलेक्शन दाखवलं आहे.
advertisement
3/7
गिरिजाला साड्यांची आवड असल्याने अनेकदा ती साडीतच दिसून येते. तिचा निळी साडी आणि पांढरा ब्लाउज असलेला फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.
advertisement
4/7
Hauterrfly सोबतच्या मुलाखतीत गिरिजा म्हणाली की तिच्याकडे जवळपास 400 साड्या आहेत. आई आणि आजीपासून तिला हा साड्यांचा खजिना मिळाला आहे.
advertisement
5/7
प्रत्येक साडी खूप महाग आहे. देशाच्या प्रत्येक कोपऱ्यातील, विविध संस्कृती आणि परंपरांशी जोडलेल्या साड्या तिच्या कलेक्शनमध्ये आहेत. तिने सर्वात आधी आपल्या आजीची एक साडी दाखवली जी 60–70 वर्षे जुनी आहे.
advertisement
6/7
आजीची ही साडी हाताने रंगवलेली शिफॉनची होती. क्रीम रंगाची ही साडी खूप महागडी आहे. तिच्याकडे एक बनारसी साडीही. या साडीची किंमतदेखील खूप जास्त आहे.
advertisement
7/7
गिरिजा ओक या मुलाखतीत म्हणाली की, साडीची किंमत तर ‘किडनीच्या किमती’इतकी आहे लाखोंमध्ये. तुम्ही एखादी साडी नीट जपली तर ती एक गुंतवणूक ठरू शकते. कोणत्याही साइजच्या महिलेला साडी सहज शोभते. गिरिजांच्या कडे अशीही एक साडी आहे ज्यावर Audrey Hepburn चे चित्र आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
गिरीजा ओकची फक्त निळी साडीच होतेय व्हायरल, पण अभिनेत्रीकडे 400 साड्यांचं कलेक्शन, किंमत लाखोंच्या घरात