TRENDING:

Govinda : गोविंदा हॉस्पिटलमध्ये, पण पत्नी सुनीता का नव्हती सोबत? अखेर जवळच्या मित्राने सांगितलं शॉकिंग कारण

Last Updated:
Govinda : मंगळवारी रात्री उशिरा गोविंदांला अचानक अशक्तपणा जाणवला आणि तो चक्कर येऊन पडला. मात्र, या प्रसंगी पत्नी सुनीता आहुजा त्याच्यासोबत का नव्हत्या, याबद्दलचा खुलासा केला आहे.
advertisement
1/10
गोविंदा हॉस्पिटलमध्ये, पण पत्नी सुनीता का नव्हती सोबत? अखेर समोर आलं कारण
मुंबई : बॉलिवूडचा सर्वाधिक चर्चेत राहणारा अभिनेता म्हणजे गोविंदा. गेल्या वर्षभरात गोविंदाच्या खाजगी आणि वैवाहित जीवनातील घडामोडींमुळे तो चर्चेचा केंद्रबिंदु ठरला आहे. अशातच आज सकाळी गोविंदासोबत धक्कादायक घटना घडली.
advertisement
2/10
अचानक प्रकृती बिघडल्यामुळे गोविंदाला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी सकाळी ही बातमी येताच त्याच्या चाहत्यांमध्ये चिंता पसरली.
advertisement
3/10
मंगळवारी रात्री उशिरा गोविंदांला अचानक अशक्तपणा जाणवला आणि तो चक्कर येऊन पडला. मात्र यावेळी त्याची पत्नी सुनीता आहुजा, त्याच्यासोबत नव्हती.
advertisement
4/10
या संपूर्ण घटनेनंतर, त्याचे जवळचे मित्र आणि कायदेशीर सल्लागार ललित बिंदल रात्री नेमके काय झाले आणि या प्रसंगी पत्नी सुनीता आहुजा त्याच्यासोबत का नव्हत्या, याबद्दलचा खुलासा केला आहे.
advertisement
5/10
गोविंदाला मंगळवारी रात्री उशिरा अस्वस्थ वाटू लागल्याने मुंबईतील क्रिटिकेअर एशिया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
advertisement
6/10
ललित बिंदल यांनी 'हिंदुस्तान टाईम्स'ला सांगितले, "मंगळवारी दिवसा त्यांना अशक्तपणा होता. संध्याकाळी अचानक काही सेकंदांसाठी अस्वस्थ वाटू लागले आणि ते बेशुद्ध झाले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी औषध घेतले आणि रात्री ९ वाजता आराम करण्यासाठी खोलीत गेले."
advertisement
7/10
"रात्री १२ च्या सुमारास त्यांना पुन्हा अस्वस्थता, अशक्तपणा आणि गुदमरल्यासारखे वाटू लागले. त्यांनी लगेच मला घरी बोलावले. मी रात्री १२:१५ वाजता त्यांच्या घरी पोहोचलो आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेले," असे बिंदल यांनी सांगितले.
advertisement
8/10
गोविंदाला तातडीने इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते, पण त्याची प्रकृती सुधारल्याने त्याला खासगी खोलीत हलवले गेले. आज दुपारी त्याला डिस्चार्ज मिळाला असून तो सध्या विश्रांती घेत आहेत आणि त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
advertisement
9/10
या गंभीर प्रसंगी गोविंदासोबत पत्नी सुनीता का नव्हत्या, याबद्दल अनेकांना आश्चर्य वाटले. ललित बिंदल यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले. बिंदल यांनी सांगितले, "सुनीता शहरात नव्हत्या. त्या एका लग्नसमारंभासाठी मुंबईबाहेर गेल्या होत्या. त्या रात्री उशिरा मुंबईत पोहोचल्या आणि आता रुग्णालयात येत आहेत. त्यांची मुलगी टीना सुद्धा कामासाठी चंदीगढमध्ये होती, ती देखील संध्याकाळपर्यंत मुंबईत पोहोचेल."
advertisement
10/10
दरम्यान, खुद्द गोविंदाने "मी ठीक आहे" असा छोटा व्हॉईस मेसेज ANI ला देऊन आपल्या चाहत्यांना दिलासा दिला आहे. त्याचे चाहते तो पूर्ण आणि लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Govinda : गोविंदा हॉस्पिटलमध्ये, पण पत्नी सुनीता का नव्हती सोबत? अखेर जवळच्या मित्राने सांगितलं शॉकिंग कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल