2 तास 15 मिनिटांची जबरदस्त हॉरर फिल्म, प्रत्येक दृश्यात थरार आणि भीती, पाहून भल्याभल्यांना घाम फुटेल
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Horror Thriller Film : ‘किलर क्लाउन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिरीयल किलरच्या व्यक्तिरेखेवर आधारित या हॉरर चित्रपटातील प्रत्येक दृश्य इतके भयानक आहे की आजही लोकांना ते एकट्याने पाहताना घाम फुटतो.
advertisement
1/7

भीतीचा जन्म कधी, कसा होईल हे सांगता येणार नाही. अनेक वेळा रोजच्या आयुष्यातील साध्या वस्तू किंवा घटना सुद्धा मनातल्या भीतीचे कारण ठरतात. अशाच भयावह उदाहरणांपैकी एक म्हणजे क्लाउन, म्हणजेच जोकर. जो साधारणतः मुलांचे मनोरंजन करणारा आणि आनंद देणारा समजला जातो, पण काही चित्रपटांनी त्याला सर्वात मोठ्या भीतीचे प्रतीक बनवले आहे.
advertisement
2/7
चित्रपटांच्या इतिहासात जोकरवर अनेक चित्रपट बनले आहेत. त्यापैकी काहींनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तर काहींनी त्यांच्यात खरी भीती निर्माण केली. आज आपण अशाच एका सिरीयल किलरवर आधारित भयपट थ्रिलर चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यातील प्रत्येक दृश्य भीती आणि दहशतीने भरलेली आहे.
advertisement
3/7
'IT' या सीरिजचा पहिला भाग 2017 मध्ये तर दुसरा भाग 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कथा एका भयानक जोकराभोवती फिरते, ज्याला पेनीवाइझ म्हणून ओळखले जाते. स्टीफन किंग यांच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट यापूर्वी 1990 साली एक मिनी सीरिज म्हणूनही प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आला होता.
advertisement
4/7
पेनीवाइझ दर काही दशकांनी डेरी, मेन या काल्पनिक शहरात परत येतो आणि मुलांच्या मनातील भीतीचा वापर करून त्यांना आपले बळी बनवतो. जरी पेनीवाइझ हा एक काल्पनिक पात्र असला, तरी त्याची निर्मिती वास्तविक घटनांमधून, विशेषतः सिरीयल किलर जॉन वेन गेसी यांच्या प्रेरणेने झालेली आहे.
advertisement
5/7
जॉन वेन गेसी हा एक कुख्यात अमेरिकन सिरीयल किलर होता. ज्याला 1972 ते 1978 दरम्यान 33 तरुणांची हत्या केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते. तो पार्ट्या आणि चॅरिटी कार्यक्रमांमध्ये क्लाउन म्हणून वेश बदलून लोकांचे मनोरंजन करायचा आणि त्यानंतर त्यांनाच आपले बळी बनवायचा. जॉन वेन गेसीने दीर्घकाळ दुहेरी आयुष्य जगले. दिवसा तो एक व्यापारी आणि समाजसेवक म्हणून वागत असे. तर रात्री तो तरुणांना आपल्या घरी बोलावून त्यांची निर्दयीपणे हत्या करत असे.
advertisement
6/7
‘IT’ सीरिजमध्ये पेनीवाइझ हा गटारांमध्ये, अंधाऱ्या कोपऱ्यांत आणि शांत गल्लीबोळांमध्ये लपून बसतो आणि मुलांच्या भीतीचा फायदा घेतो. त्याचवेळी, जर जॉन वेन गेसी बद्दल बोलायचे झाले, तर त्याच्या अपराधांनी संपूर्ण जगाला हादरवून सोडले होते. त्याने आपल्या अनेक बळींना घराखाली पुरून टाकले होते.
advertisement
7/7
गेसीचा क्लाउन अवतार “पोगो द क्लाउन” हा चॅरिटी कार्यक्रम आणि मुलांच्या पार्ट्यांसाठी वापरला जायचा, ज्यामुळे त्याचे अपराध आणखी भयानक आणि धक्कादायक वाटतात. 1994 मध्ये, हत्यांसाठी दोषी ठरल्यानंतर गेसीला फाशीची शिक्षा देण्यात आली. पण त्याने मागे अशी एक दहशतीने भरलेली कहाणी ठेवली, जी आजही भयकथांच्या चाहत्यांना अस्वस्थ आणि विचलित करते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
2 तास 15 मिनिटांची जबरदस्त हॉरर फिल्म, प्रत्येक दृश्यात थरार आणि भीती, पाहून भल्याभल्यांना घाम फुटेल