13व्या वर्षी पालकांचा डिवोर्स, 20 वर्षांपासून वडिलांपासून दूर, सुनील शेट्टीच्या होणाऱ्या सुनेची इमोशनल स्टोरी
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Jiya Shankar Inside Story : सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी हा मराठी अभिनेत्री जिया शंकर हिला डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे. जिया शंकरची इनसाइड स्टोरी खूप इमोशनल आहे.
advertisement
1/9

दिवाळ आणि तुळशीच्या लग्नानंतर सेलिब्रेटींचीही लगीन सराई सुरू झाली आहे. अशातच प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीच्या लग्नाचीही चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
2/9
अहान हा मराठमोळ्या अभिनेत्रीला डेट करत असल्याचं समोर आलं आहे. वेड सिनेमातून मराठी सिनेमांत पदार्पण करणारी मराठी अभिनेत्री जिया शंकर सुनील शेट्टीची होणारी बायको असल्याचं म्हटलं जात आहे.
advertisement
3/9
जिया शंकर ही अनेक वर्ष साऊथमध्ये काम करत आहे. बिग बॉस ओटीटी सीझन 2 मध्ये ती सहभागी झाली होती. त्यानंतर रितेश देशमुखच्या वेड या मराठी सिनेमातही ती दिसली.
advertisement
4/9
सुनील शेट्टीच्या होणाऱ्या सुनेची इनसाइड स्टोरी खूपच इमोशनल आहे. तिच्या वडिलांना ती मागील 20 वर्षांपासून भेटलेली नाही. तिचे वडील कोण आहेत हे तिला माहिती नाही. बिग बॉस ओटीटीमध्ये असताना जियाने तिच्या वडिलांबद्दल सांगितलं होतं.
advertisement
5/9
जियाने सांगितलं होतं की, तिचे वडील तिला आणि तिच्या आईला 20 वर्षांपूर्वी सोडून गेले. तेव्हापासून त्यांनी कधीही त्यांच्याशी संपर्क साधला नाही. तिला त्याचा पत्ता माहित नाही. त्यांनी दुसरं लग्न केलं आणि त्यांना आता एक मुलगी आहे.
advertisement
6/9
जिया शंकर कधीच तिच्या वडिलांना भेटली नाही. मग ती त्यांचं नाव कसं लावते. जियाची आई मराठी आहे. तिचं नाव सुरेखा गवळी असं आहे. जिया 13 वर्षांची असताना तिचे आई-वडील वेगळे झाले. जियाने तिच्या नावापुढे शंकर हे नाव स्वत: लावलं आहे.
advertisement
7/9
जियाने वडिलांबद्दल असंही सांगितलं होतं की, "आम्ही कधीही बोललो नाही. मला ते कुठे आहे किंवा ते कसे दिसताच हे देखील माहित नाही. मी त्याचा आवाजही ऐकला नाही. मी गेल्या 20 वर्षांत त्यांच्याशी बोलले नाही."
advertisement
8/9
जियाने पुढे सांगितलं, "जेव्हा मी इतर कुटुंबांना एकत्र पाहते, जेव्हा एखादी वयस्कर व्यक्ती मला काही सांगते आणि मी माझ्या भावना व्यक्त करू शकत नाही तेव्हा मला ते तिथे नसल्याचं वाईट वाटतं."
advertisement
9/9
"मी जेव्हा लहान होते तेव्हा मला कोणी काही बोललं तर मी धावत त्यांच्याकडे जायचे. ते माझी बाजू घ्यायचे. माझ्यासाठी ते खूप प्रोटेक्टिव्ह होते. जेव्हा जेव्हा मला असुरक्षित वाटतं तेव्हा मला त्यांची आठवण येते."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
13व्या वर्षी पालकांचा डिवोर्स, 20 वर्षांपासून वडिलांपासून दूर, सुनील शेट्टीच्या होणाऱ्या सुनेची इमोशनल स्टोरी