TRENDING:

घरात आजारी बायकोला सोडून स्टंटबाजी करणार अभिनेता? KKK 15 बाबत मोठी अपडेट

Last Updated:
Khatron Ke Khiladi 15 : 'खतरों के खिलाडी 15' या बहुचर्चित कार्यक्रमात छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे आता या कार्यक्रमाच्या TRP मध्ये वाढ होणार आहे.
advertisement
1/7
घरात आजारी बायकोला सोडून स्टंटबाजी करणार अभिनेता?
'बिग बॉस 19' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 'बिग बॉस' नंतर 'खतरों के खिलाडी' हा बहुचर्चित कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्मात्यांनी या कार्यक्रमावर काम करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
2/7
'खतरों के खिलाडी'च्या आगामी पर्वात छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री होणार असल्याचं म्हटलं जात आहे. 'खतरों के खिलाडी 15'साठी निर्मात्यांनी शोएब इब्राहिमला विचारणा केल्याचं म्हटलं जात आहे.
advertisement
3/7
टेलीचक्करच्या रिपोर्टनुसार, 'खतरों के खिलाडी 15'चे निर्माते आणि शोएब इब्राहिम यांच्यात बोलणी सुरू आहेत. रोहित शेट्टीच्या कार्यक्रमात शोएब सहभागी झाला तर तो चांगलाच धमाका करेल. पण अद्याप निर्मात्यांनी याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.
advertisement
4/7
शोएब इब्राहिम सध्या टीव्ही माध्यमापासून दूर आहे. शोएबची पत्नी दीपिका कक्कडला कॅन्सर झाला असून तो सध्या आपल्या पत्नीची काळजी घेत आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेल्या शोएबच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.
advertisement
5/7
'ससुराल सिमर का' या मालिकेच्या माध्यमातून शोएब इब्राहिम घराघरांत पोहोचला. नच बलिए 8 आणि झलक दिखला जा 11 यांसारख्या रिअॅलिटी शोमध्येही शोएब सहभागी झाला होता.
advertisement
6/7
शोएब इब्राहिमचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्याच्या 'खतरों के खिलाडी'मधील एन्ट्रीने या कार्यक्रमाच्या TRP मध्ये चांगलीच वाढ होईल. शोएबच्या जबरदस्त कार्यक्रमाची चाहत्यांना आता प्रतीक्षा आहे.
advertisement
7/7
रोहित शेट्टीचा 'खतरों के खिलाडी' हा भारतीय कार्यक्रम स्टंटबाजीवर आधारित आहे. आता या कार्यक्रमाचं नवं पर्व अर्थात 'खतरों के खिलाडी 15' जानेवारी 2026 मध्ये सुरू होणार आहे. यंदाच्या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
घरात आजारी बायकोला सोडून स्टंटबाजी करणार अभिनेता? KKK 15 बाबत मोठी अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल