TRENDING:

तो इंटिमेट सीन, खलनायकाने ओलांडल्या सर्व सीमा, थरथर कापली होती माधुरी दीक्षित; रडून झालेले हाल हाल

Last Updated:
Madhuri Dixit : माधुरी दीक्षितच्या एका चित्रपटात खलनायकाने एका इंटिमेट सीनदरम्यान सर्व सीमा ओलांडल्या होत्या. त्यावेळी 'धक धक गर्ल'चे रडून हाल हाल झाले होते.
advertisement
1/7
तो इंटिमेट सीन,  थरथर कापली होती माधुरी दीक्षित; रडून झालेले हाल हाल
बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक असणाऱ्या माधुरी दीक्षितने आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा एक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. आपल्या हास्याने, अभिनयाने आणि अदांनी तिने प्रत्येकाला वेड लावले आहे. 70-80 च्या दशकात एक असा ट्रेंड होता की काही खलनायक चित्रपटांमध्ये इंटिमेट सीनसाठी खूप प्रसिद्ध झाले होते आणि त्यांच्या नावापुढे ‘खूंखार’ आणि ‘खतरनाक’ असा टॅग लावला जात असे. अशाच एका खलनायकाने शूटिंगदरम्यान माधुरी दीक्षितसोबत एक असा इंटिमेट सीन दिला ज्यामुळे अभिनेत्रीने रडून हाल हाल झाले होते.
advertisement
2/7
बॉलिवूडमधील हा खलनायक म्हणजे रंजीत. माधुरी दीक्षितला रंजीतसोबत एक रेप सीन द्यायचा होता. ज्यामुळे माधुरी खूप घाबरून गेली होती. इतकंच नाही तर ती रडायलाही लागली होती. हा किस्सा 1988 मध्ये रिलीज झालेल्या ‘प्रेम प्रतिज्ञा’ या चित्रपटादरम्यानचा आहे.
advertisement
3/7
'प्रेम प्रतिज्ञा' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्या वेळी माधुरी दीक्षितची अवस्था खूपच वाईट झाली होती. धक-धक गर्ल खूपच घाबरली होती. माधुरी जेव्हा हा चित्रपट करत होती, तेव्हा ती इंडस्ट्रीत नव्याने आली होती.
advertisement
4/7
विक्की लालवानी यांना दिलेल्या मुलाखतीत खलनायक रंजीत म्हणाला की हा सीन समजताच माधुरी खूप घाबरली होती. त्यानंतर मी स्वतः जाऊन तिला समजावले. त्या काळात माझी प्रतिमा चित्रपटांमध्ये एक निर्दयी, खुनी आणि अत्यंत वाईट खलनायकाची होती. त्यावेळी अनेक मुलं-मुली मला घाबरत असे. माधुरीलाही माझ्या चित्रपटांतील इमेज माहित होती".
advertisement
5/7
रंजीत पुढे म्हणाले की, माधुरी खूपच घाबरलेली आणि तणावात होती आणि त्या सीनच्या शूटिंगदरम्यान ती पॅनिक झाली व नंतर रडायलाही लागली. त्यानंतर मीच जाऊन तिला समजावलं आणि म्हटलं, “मी खरं तर चांगला माणूस आहे.”
advertisement
6/7
'प्रेम प्रतिज्ञा' हा चित्रपट 1989 मध्ये प्रदर्शित झाला होता. रोमँटिक ड्रामा असणाऱ्या या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत होते.
advertisement
7/7
'प्रेम प्रतिज्ञा' या चित्रपटातील प्यार कभी कम नहीं करना, शीशे की उम्र, बाँहो में बोतल, चलना हैं तेरा काम ही गाणी चांगलीच लोकप्रिय झाली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
तो इंटिमेट सीन, खलनायकाने ओलांडल्या सर्व सीमा, थरथर कापली होती माधुरी दीक्षित; रडून झालेले हाल हाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल