14 व्या वर्षी डेब्यू, लोक व्हायचे तिच्या सौंदर्यावर फिदा,11 वर्षांनी इतकी बदलली मणिरत्मची हिरोईन, ओळखणंही कठीण
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनय क्षेत्रात काम करणं अभिनेत्रींसाठी थोडं चॅलेजिंग असतं. अभिनेत्रींच्या आयुष्यात अनेक बदल होत राहतात. अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्न झाल्यानं, आई झाल्यावर तसंच वैयक्तिक कारणांसाठी इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला. पण ही अभिनेत्री 11 वर्षांपासून इंडस्ट्रीतून गायब आहे.
advertisement
1/9

अशी एक अभिनेत्री जी गेल्या 11 वर्षांपासून इंडस्ट्रीतून गायब आहे. ती कमबॅक करेल की नाही याबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे. कारण मागच्या 11 वर्षांत तिच्यात इतका बदल झाला आहे की तिला ओळखणंही कठीण झालं आहे.
advertisement
2/9
या अभिनेत्रीची आई आणि बहिण दोघेही अभिनेत्री होत्या. अभिनेत्रीनं वयाच्या 14 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. अभिनेते मणिरत्नमबरोबर तिनं स्क्रिन शेअर केली. तिचा सिनेमा हिट झाला पण काही वर्षात ती इंडस्ट्रीतून गायब झाली.
advertisement
3/9
1980 च्या दशकात राधा नावाची एक लोकप्रिय दक्षिण भारतीय अभिनेत्री होती. मूळची तमिळ असलेली राधा अनेक सुपरहिट साउथ चित्रपटांचा भाग राहिली. मल्याळम पार्श्वभूमी असलेल्या व्यावसायिकाशी तिने लग्न केल्यानंतर अभिनयातून काहीसा ब्रेक घेतला आणि आपल्या कुटुंबाकडे लक्ष दिलं.
advertisement
4/9
राधाला दोन मुली आणि एक मुलगा आहेत. तिची मोठी मुलगी कार्तिका नायर हिने तमिळ चित्रपटसृष्टीत काही चित्रपटांमध्ये काम केलं आणि नंतर लग्न करून करिअरमधून ब्रेक घेतला.
advertisement
5/9
सर्वात जास्त चर्चा तिची धाकटी मुलगी तुलसी नायर हिची होत आहे. वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी तुलसीने मणिरत्नम दिग्दर्शित 'कदल' सिनेमातून डेब्यू केला. डेब्यू सिनेमात तिच्या सौंदर्याची आणि निरागसतेची प्रचंड चर्चा झाली होती. 'इतक्या लहान वयात इतकी प्रभावशाली भूमिका कशी काय करू शकते असे प्रश्न अनेकांना पडले होते.
advertisement
6/9
'कदल' सिनेमानंतर तुलसीने 2014 मध्ये रवी के. चंद्रन दिग्दर्शित 'यान' सिनेमात काम केलं. हे दोन्ही सिनेमा बॉक्स ऑफिसवर फासरं यश मिळवू शकले नाही. सिनेमांबरोबर तुलसी देखील गायब झाली. तिनं अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला. मागील 11 वर्ष ती कुठेच दिसली नाही.
advertisement
7/9
तुलसीने त्यानंतर आपल्या शिक्षणाला प्राधान्य दिलं आणि पूर्णवेळ अभ्यासाकडे वळली. शिक्षणानंतर ती पुन्हा चित्रपटसृष्टीत परत येईल अशी चाहत्यांना आशा होती. पण गेल्या अनेक वर्षांत ती कोणत्याही नव्या प्रोजेक्टमध्ये दिसलेली नाही.
advertisement
8/9
दरम्यान काही वर्षांपूर्वी कार्तिकाच्या लग्नावेळी तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्या फोटोंमध्ये तुलसीचं वजन वाढलेलं दिसत होतं. आता नुकतेच तिचे नवे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. या फोटोंमध्ये तिचं वजन आणखी वाढल्याचं दिसत असून. जुनी तुलसी आणि आताची तुलसी यांच्यात खूप फरक दिसत आहे.
advertisement
9/9
एकेकाळी सौंदर्यासाठी ओळखली जाणारी तुलसी आता इतकी कशी बदलली असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तुलसीचं वय आता 28 वर्ष आहे. तुलसीला काही आजार आहे का? ती मानसिकरित्या ठीक आहे का? असे प्रश्न तिचे चाहते आता विचारत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
14 व्या वर्षी डेब्यू, लोक व्हायचे तिच्या सौंदर्यावर फिदा,11 वर्षांनी इतकी बदलली मणिरत्मची हिरोईन, ओळखणंही कठीण