TRENDING:

14 व्या वर्षी डेब्यू, 2 पिक्चर करून झाली गायब; 11 वर्षांनी आली समोर, अभिनेत्रीला ओळखणंही कठीण

Last Updated:
या अभिनेत्रीनं वयाच्या 14 व्या वर्षी मणिरत्नमची हिरोईन म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. पण आज ती इंडस्ट्रीपासून गायब आहे. अनेक वर्षांपासून एकाही सिनेमात दिसली नाही.
advertisement
1/7
14 व्या वर्षी डेब्यू, 2 पिक्चर करून गायब; 11 वर्षांनी अभिनेत्रीला ओळखणंही कठीण
 80 च्या दशकात राधावाची नावाची एक प्रसिद्ध अभिनेत्री होती.  मुळची तमिळ अभिनेत्री असली तरी तिने अनेक साऊथ इंडियन सिनेमात काम केलं. मल्याळी असल्याने तिने केरळमधील एका व्यावसायिकाशी लग्न केलं.
advertisement
2/7
 अभिनेत्री राधाला लग्नानंतर दोन मुली आणि एक मुलगा झाला. तिच्या दोन्ही मुली तमिळ चित्रपटसृष्टीत अनुभवी कलाकार आहेत. तिची मोठी मुलगी कार्तिका हिने तमिळ चित्रपटसृष्टीत काही चित्रपटांमध्ये काम केलं. त्यानंतर तिनं लग्न केलं आणि चित्रपटसृष्टीपासून ब्रेक घेतला.
advertisement
3/7
राधाची दुसरी मुलगी तुलसी हिने 2013  मध्ये मणिरत्नम दिग्दर्शित 'कदल' या चित्रपटातून अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. त्यावेळी ती फक्त 14 वर्षांची होती. 'कदल' नंतर तुलसीनं 2014 मध्ये रवी के. चंद्रन दिग्दर्शित 'यान' या चित्रपटात जीवासोबत काम केलं होतं.
advertisement
4/7
दोन्ही चित्रपटांना फारश यश मिळालं नाही. या दोन चित्रपटांनंतर तुलसी नायर चित्रपटसृष्टीत दिसली नाही. तुलसीनं तिचं शिक्षण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आणि दोन चित्रपटांनंतर ती अभिनय करताना दिसली नाही.
advertisement
5/7
शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती चित्रपटसृष्टीत परत येईल अशी अपेक्षा होती परंतु त्यानंतर तुलसीनं कोणत्याही चित्रपटात काम केलेलं नाही. दरम्यान गेल्या काही वर्षांत तिचं वजन प्रचंड वाढलं आहे आणि ती इतकी बदलली आहे की ती ओळखता येत नाही.
advertisement
6/7
काही वर्षांपूर्वी कार्तिकाच्या लग्नादरम्यान तुलसीचं वजन वाढलं होतं. त्यावेळी तिचे फोटो व्हायरल झाले होते. आता,तुलसीचा एक नवीन फोटो व्हायरल होत आहे.
advertisement
7/7
तिचे वजन आणखी वाढले आहे आणि तिचे स्वरूप इतके बदलले आहे की तुम्हीही म्हणाल की ही तुलसी आहे? वयाच्या 14 व्या वर्षी चित्रपटसृष्टीत प्रवेश करणारी तुलसी आता 28 वर्षांची आहे. ती अजूनही अविवाहीत आहे.  
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
14 व्या वर्षी डेब्यू, 2 पिक्चर करून झाली गायब; 11 वर्षांनी आली समोर, अभिनेत्रीला ओळखणंही कठीण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल