डिसेंबरचा पहिला आठवडा मराठी कलाकारांनी गाजवला! 1-2 नाही तब्बल 6 सेलेब्स लग्नबंधनात, पाचवं तर होतं शॉकिंग
- Published by:Minal Gurav
Last Updated:
डिसेंबर 2025 मराठी मनोरंजनसृष्टीसाठी खास ठरला. कारण या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात अनेक मराठी कलाकारांनी लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो, व्हिडिओ आणि पोस्ट्स पाहायला मिळाल्या. प्रत्येक लग्न वेगळ्या शैलीत, आकर्षक पारंपरिक वेशभूषेत आणि खास समारंभात पार पडला. काही जोड्यांच्या लुकचं कौतुक झालं तर काहींना ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं. पण एकंदर पाहता, मराठी सिने-टीव्ही इंडस्ट्रीमध्ये ‘शुभमंगल’चा माहोल रंगून गेला.
advertisement
1/9

प्राजक्ता गायकवाड - शंभुराज : 2 डिसेंबर 2025 रोजी दोन भव्य विवाह सोहळे झाले. स्वराज्य रक्षक संभाजी फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड शंभुराज खुटवडसोबत विवाहबंधनात अडकली. प्राजक्ताचं लग्न यंदाच्या वर्षातील सेलिब्रेटींमधील सर्वांत भव्य, शाही लग्न ठरलं. रिसेप्शनला नंदीवरून एन्ट्री घेतल्यामुळे प्राजक्ता ट्रोलही झाली.
advertisement
2/9
पूजा बिरारी - सोहम बांदेकर : अभिनेते आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकरनं अभिनेत्री पूजा बिरारीसोबत लग्नगाठ बांधली. 2 डिसेंबर 2025 रोजी लोणावळ्यात दोघांचा विवाहसोहळा पार पडला. मनोरंजन विश्वातील अनेक मंडळी सोहम पूजाच्या लग्नाला हजेरी लावताना दिसले.
advertisement
3/9
भाग्यश्री न्हालवे : 'कुंकू टिकली आणि टॅटू', 'रमा राघव', 'माटी से बंधी डोर', 'पुण्यश्लोक अहिल्याबाई' सारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री भाग्यश्री न्हालवे हिनं 3 डिसेंबर महिन्यात लग्न केलं. पेशानं डॉक्टर असलेल्या उदय कुंडपबरोबर तिनं लग्नगाठ बांधली.
advertisement
4/9
तेजस्विनी लोणारी - समाधान सरवणकर : अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आणि शिवसेनेचे युवा नेते समाधान सरवणकर यांनी 4 डिसेंबर 2025 रोजी लग्न केलं. दोघांचं लग्न मुंबईत सहारा स्टार येथे पार पडलं. दोघांच्या ग्रँड वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तेजस्विनी शिवसेनेचे नेते सदा सरवणकर यांची सून झाली आहे.
advertisement
5/9
शुभांगी सदावर्ते : संगीत देवबाभळी फेम अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिनं दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. चार महिन्यांआधीच तिच्या डिवोर्सची बातमी समोर आली होती. त्यानंतर तिने 5 डिसेंबर 2025 रोजी सुमीत म्हशेळकर बरोबर लग्न केलं. दोघांनी अत्यंत जवळच्या लोकांमध्ये रजिस्टर मॅरेज केलं. शुभांगीने दुसरं लग्न केल्याची माहिती चाहत्यांसाठी बरीच शॉकिंग होती.
advertisement
6/9
निमिष कुलकर्णी : 5 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता निमिष कुलकर्णीने देखील लग्न केलं. निमिष हा कोमल भास्करबरोबर लग्नबंधनात अडकला. कोमल ही मालिकांची क्रिएटीव्ह प्रोड्यूसर आहे.
advertisement
7/9
स्वानंद केतकर - अक्षता आपटे : ऑनस्क्रिन बहिण भावाची भूमिका साकारणारा अभिनेता स्वानंद केतकर आणि अभिनेत्री अक्षता आपटे यांनी 30 नोव्हेंबर रोजी लग्न केलं. ऑनस्क्रिन भाऊ-बहिण आता खऱ्या आयुष्यात नवरा बायकोची भूमिका साकारणार आहेत.
advertisement
8/9
सूरज चव्हाण - संजना : मराठी मनोरंजन विश्वातील बहुप्रतिक्षित लग्न हे सूरज चव्हाणचं होतं. बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाने 29 नोव्हेंबर 2025 रोजी त्याची मामाची मुलगी संजना गोफणेबरोबर लग्नगाठ बांधली. मनोरंजन विश्वात सूरज चव्हाणच्या लग्नाची खूप चर्चा झाली.
advertisement
9/9
मेघन जाधव - अनुष्का पिंपूटकर : डिसेंबरच नाही तर नोव्हेंबर महिनाही मराठी कलाकारांच्या लग्नांनी गाजवला. लक्ष्मी निवास मालिकेतील अभिनेता मेघन जाधव आणि अभिनेत्री अनुष्का पिंपूटकर यांनी 16 नोव्हेंबर 2025 रोजी लग्न केलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
डिसेंबरचा पहिला आठवडा मराठी कलाकारांनी गाजवला! 1-2 नाही तब्बल 6 सेलेब्स लग्नबंधनात, पाचवं तर होतं शॉकिंग