TRENDING:

सख्ख्या आईने हंटर-चपलेने मारलं, 17व्या वर्षी झाली कास्टिंग काऊचची शिकार, अभिनेत्री TVची पॉप्युलर खलनायिका

Last Updated:
Popular Female Villain on TV: टेलिव्हिजनवर खलनायिकेची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्रीने वास्तविक जीवनात अनेक दुःख सोसले आहेत.
advertisement
1/9
सख्ख्या आईने हंटर-चपलेने मारलं, 17व्या वर्षी झाली कास्टिंग काऊचची शिकार
मुंबई: टेलिव्हिजनवर खलनायिकेची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणारी अभिनेत्री जया भट्टाचार्य पडद्यावर जितकी कणखर आणि कठोर वाटते, तितकेच खोलवरचे घाव तिने वास्तविक जीवनात सोसले आहेत.
advertisement
2/9
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जया भट्टाचार्य यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायक अनुभव उघड केले आहेत, ज्यामुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे.
advertisement
3/9
जया भट्टाचार्य यांनी सांगितले की, त्यांच्या आई-वडिलांचे वैवाहिक जीवन विषारी होते. घरात मुलगा व्हावा अशी अपेक्षा असताना मुलीचा जन्म झाल्यामुळे त्यांच्या आई-वडिलांनी याला मोठा शाप मानला होता.
advertisement
4/9
जया यांच्या जन्माने त्यांचे पालक अजिबात खूश नव्हते, कारण त्यांना मुलाची इच्छा होती. जया यांनी आईच्या रागाबद्दल बोलताना सांगितले की, "मला हंटरने मारहाण केली जायची. कधी लाटणं, कधी चिमटा तर कधी थेट चप्पलने मारले जायचे."
advertisement
5/9
या सगळ्या गोष्टींमुळे त्या खूप हट्टी बनल्या आणि स्वतःला त्यांनी खूप दुःख दिले. जया यांना खरंतर अभिनय क्षेत्रात यायचे नव्हते. त्यांचे स्वप्न वेगळे होते. जया यांना संगीत आणि नृत्यात आपले करिअर करायचे होते, पण कौटुंबिक दबावामुळे त्यांना शोबिजमध्ये यावे लागले.
advertisement
6/9
एकदा त्यांच्या वडिलांनी त्यांना पहाटे ५ वाजता उठवले आणि त्या नकार देत असूनही जबरदस्तीने शूटिंगवर घेऊन गेले, ज्यामुळे त्यांना अभिनयात यावे लागले.
advertisement
7/9
जया भट्टाचार्य यांनी घरात इतका तणाव असतानाही त्या वडिलांच्या खूप जवळ होत्या, पण आईसोबतचे त्यांचे नाते अत्यंत तणावपूर्ण होते. पण त्यांचा संघर्ष इथेच थांबला नाही.
advertisement
8/9
जया यांनी १७ ते १८ वर्षांच्या वयात कास्टिंग काऊचचा सामना केल्याचा धक्कादायक खुलासा केला. जेव्हा एका दिग्दर्शकाचा मित्र दररोज त्यांच्या घरी येऊ लागला. नंतर त्यांना कळले की तो माणूस माफिया लोकांशी संबंधित होता.
advertisement
9/9
जया भट्टाचार्य यांनी 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये नकारात्मक भूमिका साकारली होती. आज त्यांनी हे सर्व दुःख पचवून हार मानली नाही. त्यांनी आयुष्यातील या अनुभवामुळे कोणालाही न ओळखता त्यांच्याबद्दल मत बनवू नये, हे शिकल्याचे सांगितले. अलीकडेच त्या हुमा कुरेशी आणि शेफाली शाह यांच्या 'दिल्ली क्राईम सिझन ३' मध्येही दिसल्या होत्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सख्ख्या आईने हंटर-चपलेने मारलं, 17व्या वर्षी झाली कास्टिंग काऊचची शिकार, अभिनेत्री TVची पॉप्युलर खलनायिका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल