45-50 मिनिटांचे 6 एपिसोड, ही क्राइम-थ्रिलर सीरिज रिलीज होताच Netflix वर करतेय ट्रेंड
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
OTT Crime Thriller Web Series : ओटीटीवरील 6 एपिसोडची क्राइम थ्रिलर वेब सीरिज सध्या ट्रेंड करत आहे. या सीरिजच्या प्रत्येक एपिसोडमध्ये शॉकिंग सस्पेन्स पाहायला मिळेल.
advertisement
1/7

'दिल्ली क्राइम' या क्राइम ड्रामा असणाऱ्या वेब सीरिजमध्ये पोलीस व्यवस्थेची वास्तविकता दाखवण्यात आली आहे. 'दिल्ली क्राइम सीझन 3'मध्ये प्रेक्षकांना बलात्कार, हत्या आणि मानव तस्करी पाहायला मिळणार आहे. 'दिल्ली क्राइम'च्या दोन सीझनची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा झाली आहे. शेफाली शाहच्या दमदार अभिनयाने सर्वांनाच वेड लावलं आहे.
advertisement
2/7
देशातील सर्वात गाजलेल्या वेबसीरिजमध्ये 'दिल्ली क्राइम'चा समावेश होतो. रिची मेहताने या सीरिजमधील वास्तविक घटनांसाठी खूप मेहनत घेतली आहे. 'दिल्ली क्राइम सीझन 3' 13 नोव्हेंबर 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तनुज चोप्रा यांनी या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. वर्तिका चतुर्वेदी एक नॅशनल ऑपरेशन करताना दिसणार आहे. ही सीरिज प्रेक्षकांना इमोशनल आणि थ्रिलिंग राइड घडवणारी आहे.
advertisement
3/7
'दिल्ली क्राइम 3'मध्ये शेफाली शाह मुख्य भूमिकेत आहे. डीसीपी वर्तिका चतुर्वेदीच्या भूमिकेत शेफाली दिसून येत आहे. या सीरिजमध्ये रसिका दुगल नीती सिंह, राजेश तैलंग भूपेंद्र सिंह, जया भट्टाचार्य विमला भारद्वाज आणि अनुराग अरोडा जयराज सिंहच्या भूमिकेत आहेत.
advertisement
4/7
'दिल्ली क्राइम 3'मध्ये यावेळी हुमा कुरैशी मीना उर्फ बडी दीदीच्या नकारात्मक भूमिकेत आहे. अदिल हुसैन या सीरिजमध्ये सहाय्यक भूमिकेत आहे. दमदार कलाकारांची मांदियाळी असणारी ही सीरिज प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरणार आहे.
advertisement
5/7
'दिल्ली क्राइम सीझन 3'चं कथानक सत्य घटनेवर आधारित आहे. देशातील ह्यूमन ट्रैफिकिंग नेटवर्क प्रेरित या चित्रपटाची कथा आहे. समाजातील भयावह घटनांवर आधारित ही सीरिज आहे.
advertisement
6/7
'दिल्ली क्राइम सीझन 3'ला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. शेफाली शाह आणि हुमा कुरैशी यांच्या सादरीकरणाचं सर्वत्र कौतुक होत आहे. आधीच्या दोन्ही सीझनप्रमाणे यंदाचा तिसरा सीझनही आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला वेगळा ठसा उमटवणार आहे. अखेर रिलीजच्या पहिल्याच दिवशी ही सीरिज नेटफ्लिक्सची टॉप सीरिज झाली आहे.
advertisement
7/7
'दिल्ली क्राइम सीझन 3'मध्ये एकूण सहा एपिसोड आहेत. यातील प्रत्येक एपिसोड 45-50 मिनिटांचा आहे. एकंदरीत 4-5 तासांची ही सीरिज आहे. IMDB वर या सीरिजला 8.5 रेटिंग मिळाले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
45-50 मिनिटांचे 6 एपिसोड, ही क्राइम-थ्रिलर सीरिज रिलीज होताच Netflix वर करतेय ट्रेंड