OTT Releases : डिसेंबरचा पहिला आठवडा OTT लवर्ससाठी ठरला खास, रिलीज झाल्यात या 7 जबरदस्त फिल्म आणि सीरिज
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
OTT Releases This Week : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्याची सुरुवात झाली असून 1 ते 7 डिसेंबरदरम्यान प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवे चित्रपट आणि वेब सीरिज पाहायला मिळणार आहेत. नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडीओ, जिओ हॉटस्टार ते सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना या फिल्म आणि सीरिज पाहता येतील.
advertisement
1/7

द गर्लफ्रेंड (The Girlfriend) : रश्मिका मंदाना आणि दीक्षित शेट्टी यांचा 'द गर्लफ्रेंड' हा चित्रपट थिएटरमध्ये धमाका केल्यानंतर आता प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यास सज्ज आहे. 5 डिसेंबरला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट स्ट्रीम होणार आहे. हा रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे.
advertisement
2/7
स्टीफन (Stephen) : 'स्टीफन' हा तामिळ चित्रपट येत्या 5 डिसेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. हा एक सायकोलॉजिकल थ्रिलर फिल्म आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे.
advertisement
3/7
धूलपेट पुलिस स्टेशन (Dhoolpet Police Station) : 'धूलपेट पुलिस स्टेशन' ही साऊथ वेबसीरिज 5 डिसेंबरपासून जिओ हॉटस्टारवर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ही एक कॉमेडी-क्राइम थ्रिलर सीरिज आहे. तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रेक्षकांना ही सीरिज पाहता येईल.
advertisement
4/7
कुट्रम पुरिंधवन (Kuttram Purindhavan) : 'कुट्रम पुरिंधवन' ही जबरदस्त सीरिज प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज आहे. 5 डिसेंबरपासून प्रेक्षकांना सोनी लिव्हवर ही सीरिज पाहायला मिळेल.
advertisement
5/7
डाइस इरे (Dies Irae) : 'डाइस इरे' ही एक हॉरर फिल्म आहे. 5 डिसेंबरला जिओ हॉटस्टारवर प्रेक्षकांना ही सीरिज पाहायला मिळेल.
advertisement
6/7
द ग्रेट इंडियन प्री-वेडिंग शो (The Great Indian Pre Wedding Show) : 'द ग्रेट इंडियन प्री-वेडिंग शो' ही कॉमेडी ड्रामा फिल्म प्रेक्षकांना 5 डिसेंबरपासून Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल. एक वेगळा विषय असणारी ही फिल्म प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करेल. छोट्या शहरातील रमेश नामक फोटोग्राफर याच्या अवतीभोवती फिरणारी ही फिल्म आहे.
advertisement
7/7
घरवाली पेडवाली (Gharwali Pedwali) : 'घरवाली पेडवाली' हा एक सुपरनॅचरल फॅमिली कॉमेडी ड्रामा आहे. 5 डिसेंबरला Zee5 वर ही सीरिज रिलीज होत आहे. जीतू पांडे नामक एका व्यक्तीची गोष्ट या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
OTT Releases : डिसेंबरचा पहिला आठवडा OTT लवर्ससाठी ठरला खास, रिलीज झाल्यात या 7 जबरदस्त फिल्म आणि सीरिज