नंगा, बेशरम आदमी..! पीयूष मिश्रांनी केली रणबीरची A to Z पोलखोल, कपूर घराण्याबद्दलही सगळंच सांगून टाकलं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेता रणबीर कपूरचं सगळेच कौतुक करतात. पण ज्येष्ठ अभिनेते-लेखक पियुष मिश्रा यांनी रणबीरबद्दल अशा काही गोष्टी सांगितल्यात ज्याची चर्चा होतेय.
advertisement
1/7

अभिनेता रणबीर कपूर हा बॉलिवूड इंडस्ट्रीतला सर्वात हँडसम आणि तगडा अभिनेता आहे. कपूर घरण्याचा अभिनयाचा वारसा तो पुढे चालवताना दिसतोय. पण असताना रणबीरने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. रणबीरच्या कामाचं अनेकदा कौतुक झालं आहे. रणबीर त्याच्या कामात प्रचंड फोकस असतो. तो सोशल मीडियावर नाही. तो स्वत:च्या फिल्मच फार प्रमोशन करताना दिसत नाही. पण तरीही प्रेक्षकांकडून कायम त्याचं कौतुक होतं.
advertisement
2/7
ज्येष्ठ अभिनेते-लेखक पियुष मिश्रा यांनी अलीकडेच रणबीर कपूरचं वर्णन बॉलिवूडचा सर्वात अद्वितीय स्टार असं केलं आहे. पियुष मिश्रा यांनी रणबीर कपूरच्या व्यक्तिमत्त्वावर भाष्य केलं.
advertisement
3/7
द लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत पियुष मिश्रा यांनी कपूर घराण्याच्या वारशाबद्दलही बोलले. रणबीर कपूर कपूर कुटुंबाच्या चार पिढ्यांचा, त्याचे वडील ऋषी कपूर, आजोबा राज कपूर आणि पणजोबा पृथ्वीराज कपूर यांच्या वारशाचा एक टक्काही घेऊन जात नसल्याचं त्यांनी सांगितलं.
advertisement
4/7
रणबीर कपूरबद्दल विचारलं असता पियुष मिश्रा म्हणाले, "अरे विचारूही नका, तो वेगळ्याच पातळीवरचा माणूस आहे. इतका नग्न आणि निर्लज्ज माणूस मी कधीच पाहिला नाही. तो त्याचं काम करतो आणि सेटवर सगळ्यांशी खूप बोलतो. त्याच्या गप्पा अशा असतात की आता मी त्या इथे सांगू शकत नाही. तो खूप दिलदार आणि सर्वोत्तम अभिनेता आहे. या जनरेशनमध्ये त्याच्यासारखा दुसरा कलाकार नाही."
advertisement
5/7
पीयूष मिश्रा पुढे म्हणाले, "रणबीर कपूर हा या पिढीचा उत्तम अभिनेता आहे. त्याच्याइतका सर्वोत्तम अभिनेता नाही. तो सीन सुरू होताच कॅरेक्टरमध्ये शिरतो आणि जेव्हा कॅमेरा ऑफ होतो तेव्हा तो इतरांबरोबर मस्ती करायला सुरुवात करतो. त्याची स्विच ऑन आणि स्विच ऑफ करायची पद्धत खूप कमाल आहे, ही पद्धत खूप कमी कलाकारांकडे आहे."
advertisement
6/7
"तो भूमिकेत नसतो तेव्हा तो खूप मज्जा करतो. कपूर कुटुंबाचा वारसा तो त्याच्या खांद्यावर घेऊन चालत नाही. त्याने वडील इतके मोठे कलाकार होते. त्याचे आजोबा सिनेमाचे जादूगार होते आणि त्याचे पणजोबा ते सुप्रसिद्ध अभिनेते. पण रणबीर त्याचं काम करतो. तो त्यांचं ओझं वाहून नेत नाही."
advertisement
7/7
रणबीर कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास, रणबीर कपूर सध्या संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर' या सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. हा सिनेमा 2026 मध्ये रिलीज होणार आहे. त्याचबरोबर 2026 च्या दिवाळीत नितीश तिवारी यांच्या 'रामायण' सिनेमातही रणबीर दिसणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
नंगा, बेशरम आदमी..! पीयूष मिश्रांनी केली रणबीरची A to Z पोलखोल, कपूर घराण्याबद्दलही सगळंच सांगून टाकलं