TRENDING:

लग्नाआधी प्राजक्ताने सांगितली एक गोष्ट, शंभुराजनं घेतली खूपच मनावर; पाहून सासरचेही झाले शॉक

Last Updated:
Prajakta Gaikwad - Shambhuraj Khutwad : अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिनं लग्नासाठी शंभुराजला असं काय सांगितलं जे त्याने खूपच मनावर घेतलं. त्याने असं काही केलं की सगळेच शॉक झाले.
advertisement
1/7
लग्नाआधी प्राजक्ताची ती 1 गोष्ट शंभुराजनं घेतली खूपच मनावर; सासरचेही झाले शॉक
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनं नुकतंच लग्न केलं. शंभुराज खुटवडबरोबर लग्न लग्नगाठ बांधली. पुण्यात मोठ्या थाटात प्राजक्ता आणि शंभुराज यांचा विवाहसोहळा पार पडला. प्राजक्ता आणि शंभुराज यांचं अरेंज मॅरेज झालं. पण दोघांमधील प्रेम पाहता असं दोघांचं लव्ह मॅरेज असावं असं वाटत होतं.
advertisement
2/7
प्राजक्ता आणि शंभुराज यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्राजक्ता आणि शंभुराज यांच्या घरी रितसर बघण्याचा कार्यक्रम पार पडला होता. शंभुराजनं घरी जाऊन प्राजक्ताचा हात मागितला होता. 
advertisement
3/7
लग्नाआधी प्राजक्ता शंभुराजला असं काही बोलली होती की ती गोष्ट शंभुराजने खूपच मनावर घेतली. शंभुराजने प्राजक्तासाठी असं काही केलं की प्राजक्ताच्या सासरची संपूर्ण मंडळी देखील शॉक झाली होती. शंभुराजने केलेल्या याच कृतीवर प्राजक्ता भाळली आणि त्याच्या प्रेमात पडली.  
advertisement
4/7
नवऱ्यामधल्या अशा कोणत्या रोमँटीक गोष्टी आहेत ज्या तुझ्या अहोंनी तुझ्यासाठी केल्या आहेत आणि ज्या तुला वाटल्या की या खूपच भारी आहेत, असा प्रश्न प्राजक्ताला एका मुलाखतीत विचारण्यात आला. उत्तर देत प्राजक्ता म्हणाली, खूप गोष्टी आहेत. नक्की कोणती सांगू. ते मला विचारायला माझ्या घरी आले होते तेव्हा मला अजिबात वाटलं नव्हतं की ते येतील."
advertisement
5/7
"पण जेव्हा ते आले होते तेव्हा ते आले होते तेव्हा मी एकच गोष्ट सांगितली होती की, मला नॉनव्हेज खाणारा मुलगा नकोय. मुळात मी हे असं म्हटलं होतं कारण ते पैलवान घराण्यातील आहेत. त्यामुळे मी असंच म्हटलं की बघू यांचं किती डेडिकेशन आहे माझ्यासाठी. "
advertisement
6/7
 प्राजक्ता पुढे म्हणाला, "दुसऱ्या दिवशी ते पंढरपूरला गेले आणि त्यांनी गळ्यात तुळशीची माळ घातली. तेव्हापासून त्यांनी नॉनव्हेज पूर्णपणे सोडलं. 365 दिवस दिवसांतून 3-3 दिवस नॉनव्हेज खाणारा मुलगा जर माझ्यासाठी नॉनव्हेज सोडतोय तर ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आम्ही दोघेही आता प्युअर व्हेजिटेरियन आहोत."
advertisement
7/7
प्राजक्ता आणि शंभुराज यांची भेट रस्त्यात अपघाती झाली होती. शुंभराज यांचा ट्रक प्राजक्ताच्या गाडीसमोर आला. प्राजक्ता घाईत शूटला निघाली होती. रस्त्यात गाडी थांबल्यानं प्राजक्ता रागात ट्रक मालकाशी भांडायला गेली. तो ट्रक मालक शंभुराज होता. तिथेच दोघांची पहिली भेट झाली आणि पहिल्या भेटीत शंभुराज प्राजक्ताच्या प्रेमात पडला. नंतर शंभुराजने घरी येऊन प्राजक्ताला लग्नाची मागणी घातली.  
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
लग्नाआधी प्राजक्ताने सांगितली एक गोष्ट, शंभुराजनं घेतली खूपच मनावर; पाहून सासरचेही झाले शॉक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल