Pranit More : 'तू काळा आहेस, इंग्लिशही येत नाही', लोक हिणवायचे, प्रणित मोरेनं सांगितला बालपणीचा कटू अनुभव
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Pranit More : कॉमेडियन प्रणित मोरेनं त्याच्या बालपणीचा कटू अनुभव सर्वांबरोबर शेअर केला. त्याची आजवर कधीच समोर न आलेली बाजू पहिल्यांदाच समोर आली.
advertisement
1/7

सध्या बिग बॉस 19 मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला कॉमेडीयन प्रणित मोरेनं पुन्हा एकदा घरात प्रवेश केला आहे. डेंग्यू झाल्याने काही दिवसांसाठी प्रणितला मेडिकल रुममध्ये ठेवण्यात आलं होतं. बरा झाल्यानंतर प्रणितने पुन्हा बिग बॉस 19 च्या घरात एन्ट्री घेतली आहे.
advertisement
2/7
आजवर प्रणित मोरेचा कॉमेडी अंदाज सगळ्यांना माहिती होता. प्रेक्षकांना हसवणारा प्रणित मोरे सगळ्यांना माहिती आहे पण याच प्रणित मोरेची एक हळवी बाजू देखील आहे. प्रणित मोरेनं पहिल्यांदाच त्याची एक वेगळी बाजू प्रेक्षकांसमोर आणली आहे.
advertisement
3/7
लहानपणापासून त्याला त्याच्या रंगावरून अनेक नकार आणि अपमान सहन करावा लागला होता. बिग बॉस 19 च्या घरात प्रणित मोरेनं सांगितलं. तो म्हणाला, "मी जेव्हा छोटा होता तेव्हा मला म्हणायचे तू डार्क ( काळा ) आहेस, त्यामुळे तू कुठेतरी कमी आहेस. सगळे चिडवायचे. ही गोष्ट माझ्या हातात नाही त्यासाठी मला बोललं जात आहे हे कळलं तेव्हा मला खूप वाईट वाटायचं."
advertisement
4/7
"एका काळानंतर मला कळलं की मी जर गप्प बसलो तर लोक मला असेल बोलत राहणार. त्यामुळे पहिल्यापासूनच अशी काही उत्तर द्यायचो ज्यामुळे तेही शांत बसतील." त्यानंतर प्रणितने मी कधीच कोणाची बॉडी टाइपचा किंवा रंगावरून मस्करी करणार नाही.
advertisement
5/7
प्रणितने पुढे सांगितलं, "हेच कारण आहे, तुम्ही या शोमध्येही जर बघितलं असेल तर मी कधीच कोणाचं बॉडी शेमिंग केलेलं नाही की कधी कोणाला वाईट वाटेल असं बोललेलो नाही. कारण मला माहिती आहे की या गोष्टी एखाद्याच्या मनात किती खोल लागू शकतात."
advertisement
6/7
प्रणितला त्याच्या रंगावरूनही हिणवलं जायचं. त्याने सांगितलं. "मी जेव्हा शाळा आणि कॉलेजमध्ये होतो तेव्हा बोलायचा कॉन्फिडन्स नव्हता, मला इंग्रजी येत नव्हतं. त्याहून मोठी गोष्ट ही होती की, लोक मला जाणीव करून द्यायचे की तुला इंग्रजी येत नाही, तुला काही येत नाही. मग ते माझ्या दिसण्यावर कमेन्ट करायचे."
advertisement
7/7
प्रणित मोरेनं बिग बॉस 19 च्या घरात गेल्यापासून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. मराठी तसंच अमराठी प्रेक्षकही प्रणितला सपोर्ट करत आहे. प्रणित मोरे बिग बॉस 19 चा विनर असल्याचंही बोललं जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Pranit More : 'तू काळा आहेस, इंग्लिशही येत नाही', लोक हिणवायचे, प्रणित मोरेनं सांगितला बालपणीचा कटू अनुभव