'5 वर्षात दिसणार नाही', अभिनयवर टिका करणाऱ्यांना प्रिया बेर्डेंचं सणसणीत उत्तर, सांगितली इंडस्ट्रीमधील खरी परिस्थिती
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Priya Berde: अभिनयला अनेकदा ट्रोलिंग आणि नेपोटिझमच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. यावर प्रिया बेर्डे यांनी ट्रोलर्सना सणसणीत उत्तर दिलं आहे.
advertisement
1/8

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील 'विनोदाचा बादशहा' लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनानंतर अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी एकट्याने मुलांचे संगोपन केले. आता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे याने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत कलाविश्वात आपले स्थान निर्माण केले आहे.
advertisement
2/8
मात्र, अभिनयला अनेकदा ट्रोलिंग आणि नेपोटिझमच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. याच पार्श्वभूमीवर, नुकत्याच एका मुलाखतीत प्रिया बेर्डे यांनी अभिनयच्या इंडस्ट्रीतील प्रवासावर आणि त्याला आलेल्या अनुभवांवर भावूक पण स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
3/8
अभिनय जेव्हा सिनेसृष्टीत आला, तेव्हा त्याला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल प्रिया बेर्डे यांनी खुलासा केला. प्रिया बेर्डे म्हणाल्या, "मला म्हटलेलं, तुझा मुलगा पाच वर्षांत दिसणार नाही. मी तुझ्या मुलासोबत काम करणार नाही. तेव्हा मी मनात म्हटलं की तू पाच वर्षांत कुठे असशील ते बघुया. या गोष्टीला सात आठ वर्ष झाली. आज ती व्यक्ती कुठेही नाहीय."
advertisement
4/8
"अभिनय इंडस्ट्रीत आला, तेव्हा तो कुठल्याही प्रकारचे अभिनयाचे शिक्षण घेऊन आलेला नव्हता. त्यामुळे लोकांनी त्याला खूप ट्रोल केले. त्याला नेपोटिझम बाबतही खूप बोलले गेले. आम्ही कोणत्या पद्धतीचे आयुष्य जगतो, या मुलांना कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो, हे लोकांना कळत नाही. इंडस्ट्रीत तोंडावर गोड बोलणारे खूप आहेत, पण मागून नावे ठेवणारेही असतात," अशा शब्दांत त्यांनी कटू अनुभव सांगितले.
advertisement
5/8
प्रिया बेर्डे यांनी अभिमानाने सांगितले की, "या सगळ्या गोष्टी अभिनयने पचवून तो आज जो एक माणूस म्हणून आणि कलाकार म्हणून उभा राहिला आहे, हे फक्त त्याचं यश आहे."
advertisement
6/8
वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी लहान वयातच कशी पेलली, या प्रश्नावर अभिनयने अत्यंत सुंदर उत्तर दिले. अभिनय म्हणाला, "सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे, माझी बहीण स्वानंदी आणि आई प्रिया बेर्डे दोघीही खूप खंबीर आहेत. त्यामुळे त्यांची जबाबदारी कोणालाही घेण्याची गरज नाही."
advertisement
7/8
तो पुढे म्हणाला, "आमच्या घरामध्ये कोणी एकच माणूस कर्ताधर्ता आहे, असे अजिबात नाही. आम्ही तिघे समान वयाचे तीन रूममेट्स एकत्र कसे राहतात, तसे राहतो. कोणी एक लीडर आहे, असे नाही."
advertisement
8/8
अभिनयने स्पष्ट केले की, प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्या पूर्ण करायच्या आहेत, हे आम्हाला माहीत आहे. आईने कधीही ते प्रेशर येऊ दिले नाही, त्यामुळे आम्हाला त्याचा ताण वाटला नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'5 वर्षात दिसणार नाही', अभिनयवर टिका करणाऱ्यांना प्रिया बेर्डेंचं सणसणीत उत्तर, सांगितली इंडस्ट्रीमधील खरी परिस्थिती