TRENDING:

Priyanka Chopra: “हिंदी सिनेमात काम करत होते तेव्हा…” प्रियंका चोप्राने सांगितली आतली गोष्ट; नेमकं काय घडलं?

Last Updated:
Priyanka Chopra On Bollywood Industry: "हिंदी चित्रपटांमध्ये काम करत होते तेव्हा...", प्रियांका चोप्राने सांगितलं बॉलिवूड सोडण्याचं खरं कारण; नेमकं काय घडलं?
advertisement
1/6
“हिंदी सिनेमात काम करत होते तेव्हा…” प्रियंका चोप्राने सांगितली आतली गोष्ट
कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या प्रियंका चोप्राने 2000 पासून आपल्या फिल्मी करियरला सुरूवात केली. बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या प्रियंकाने अचानक बॉलिवूड सोडलं. दोन्हीही इंडस्ट्रीमध्ये काम करत असल्यामुळे तिला बॉलिवूडमध्ये काम मिळत नव्हते. याबद्दल अभिनेत्रीने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे.
advertisement
2/6
प्रियंका चोप्राने बॉलिवूड इंडस्ट्री का सोडली? या प्रश्नावर तिने भाष्य केलं आहे. फर्स्टपोस्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रियंकाने हा महत्त्वाचा खुलासा केला आहे. प्रियंका आता 'वाराणसी' चित्रपटातून पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करते. अभिनेत्री त्यासाठी खूपच उत्सुक आहे. अभिनेत्रीने अनेक मुद्द्यांवर आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
3/6
फर्स्टपोस्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रियंकाने सांगितले की, "मला केव्हाच बॉलिवूड सोडायचं नव्हतं. जेव्हा मी बॉलिवू़डमध्ये काम करत होते, तेव्हा मला कोणी तरी एका चौकटीत रोखून धरलं आहे, असं वाटत होतं. मला एका पद्धतीने नाकारलं जात होतं. मी अशा संधीच्या शोधात होते की, जिथे कलाकारांना कामासाठी उत्तेजित केलं जाईल."
advertisement
4/6
"माझं कामाप्रती खूप प्रेम आहे. मला इंडियन फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायला आवडतं. मला 'वाराणसी' चित्रपटामध्ये काम करण्यासाठी मी खूप आनंदित आहे. मला दोन्ही इंडस्ट्रीत काम करताना आनंद होत आहे. दोन्हीकडे काम करताना मजा येतेय. सांस्कृतिक फरक आहेत, पण मला काम करायला आवडत आहे.”
advertisement
5/6
प्रियांका चोप्राच्या 'वाराणसी' चित्रपटात महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन सुद्धा काम करणार आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी अर्थात 2027 च्या एप्रिल महिन्यामध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.
advertisement
6/6
" म्हणून मी अमेरिकेत काम करण्यासाठी सुरूवात केली. तेव्हापासून ते आजपर्यंत मी उत्तम पद्धतीने काम करत आहे. मला हॉलिवूड इंडस्ट्रीत 12 वर्षे झाली. मी आता बॉलिवूडमधून पुन्हा डेब्यू करते. मी एसएएस राजामौलींच्या चित्रपटातून कमबॅक करण्यासाठी खूपच उत्सुक आहे. मला एकाच इंडस्ट्रीमध्ये काम करू शकत नाही."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Priyanka Chopra: “हिंदी सिनेमात काम करत होते तेव्हा…” प्रियंका चोप्राने सांगितली आतली गोष्ट; नेमकं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल