TRENDING:

'रामायण'मधील लक्ष्मणाने धर्मेंद्र यांच्याकडून घेतलेली ही मौल्यवान गोष्ट, हेमा मालिनींना ही नव्हतं माहित

Last Updated:
Sunil Lahri on Dharmendra : हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्याकडून 'रामायण' मालिकेतील सुनील लहरी यांनी एक मौल्यवान गोष्ट घेतली होती. विशेष म्हणजे हेमा मालिनी यांनाही याबाबत माहिती नव्हतं.
advertisement
1/7
'रामायण'मधील लक्ष्मणाने धर्मेंद्र यांच्याकडून घेतलेली ही मौल्यवान गोष्ट
हिंदी चित्रपटसृष्टीतील 'ही-मॅन' अर्थात धर्मेंद्र यांनी 24 नोव्हेंबर 2025 रोजी 89 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. निधनाआधी काही दिवस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
advertisement
2/7
रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेतील लक्ष्मणाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सुनील लहरी यांनी धर्मेंद्र यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
advertisement
3/7
सुनील लहरी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत धर्मेंद्र यांच्यासोबतची एक आठवण शेअर केली आहे. विशेष म्हणजे हेमा मालिनी यांनाही ही गोष्ट माहिती नसल्याचं सुनील लहरी यांनी सांगितलं.
advertisement
4/7
सुनील लहरी यांनी धर्मेंद्र यांच्याशी झालेल्या भेटीचे आणि आठवणींचे किस्से चाहत्यांसोबत शेअर केले. तसेच ‘रामायण’ फेम सुनील यांनी धर्मेंद्र यांचे कौतुक करताना ते कसे माणूस होते हे सांगितले. हे ऐकून चाहत्यांनी धर्मेंद्र यांच्या स्वभावाचे आणि त्यांच्या महानतेचे भरभरून कौतुक केले. सुनील लहरी यांनी सांगितले की त्यांनी धर्मेंद्र यांच्याकडून एक अतिशय मौल्यवान वस्तू खरेदी केली होती, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती होती.
advertisement
5/7
सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये सुनील लहरी यांनी सांगितलं की, जेव्हा त्यांनी मुंबईत धर्मेंद्र यांचा एक फ्लॅट खरेदी केला होता आणि ती भेट त्यांच्यासाठी अतिशय खास ठरली.
advertisement
6/7
सुनील पुढे म्हणाले की या प्रॉपर्टीबाबत त्यांची पहिली चर्चा सनी देओल यांच्यासोबत झाली होती. पण नंतर ही डील थेट धरमजींसोबत पक्की झाली. त्यांनी हेही सांगितले की कागदपत्रांवर सही धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांनी केली होती.
advertisement
7/7
सुनील लहरी पुढे सांगतात की जेव्हा डील फायनल झाली तेव्हा धर्मेंद्र यांनी त्यांना पहिला प्रश्न विचारला होता की, या घरात कोण राहणार? यावर सुनील म्हणाले की ते स्वतः या फ्लॅटमध्ये राहणार आहेत. त्यावेळी धर्मेंद्र यांना सुनील यांच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. त्यामुळे जेव्हा सुनील यांनी सांगितले की त्यांनी ‘रामायण’मध्ये लक्ष्मणाची भूमिका केली आहे. तेव्हा धर्मेंद्र खूप आनंदी झाले आणि त्यांनी सुनील यांना मिठी मारून आशीर्वाद दिला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'रामायण'मधील लक्ष्मणाने धर्मेंद्र यांच्याकडून घेतलेली ही मौल्यवान गोष्ट, हेमा मालिनींना ही नव्हतं माहित
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल