Shriya Pilgaonkar : लग्नाबद्दल पहिल्यांदाच स्पष्ट बोलली श्रिया पिळगांवकर, 'आईबाबांनी सांगितलंय, लग्न करायचं नसेल तर...'
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Shriya Pilgaonkar Marriage : श्रिया ३६ वर्षांची असूनही अजूनही अविवाहित आहे, ज्यामुळे तिला अनेकदा ‘लग्न कधी करणार?’ असा प्रश्न विचारला जातो. नुकतंच तिने यावर खूप मनमोकळेपणाने उत्तर दिलं आहे.
advertisement
1/7

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील लाडकं जोडपं सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर यांची लेक श्रिया पिळगांवकर सध्या तिच्या कामामुळे खूपच चर्चेत आहे. ‘मिर्झापूर’, ‘गिल्टी माइंड्स’ आणि नुकत्याच आलेल्या ‘मंडला मर्डर्स’ या वेब सिरीजमुळे ती आता ‘वेब सिरीज क्वीन’ म्हणून ओळखली जाते.
advertisement
2/7
श्रिया ३६ वर्षांची असूनही अजूनही अविवाहित आहे, ज्यामुळे तिला अनेकदा ‘लग्न कधी करणार?’ असा प्रश्न विचारला जातो. नुकतंच तिने यावर खूप मनमोकळेपणाने उत्तर दिलं आहे.
advertisement
3/7
एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत श्रियाने सांगितलं की, तिला गेल्या वर्षभरापासून हा प्रश्न विचारला जात आहे. पण, तिच्यावर याबद्दल कोणतंही दडपण नाही.
advertisement
4/7
ती म्हणाली, “माझ्या आई-वडिलांना पूर्ण कल्पना आहे की, जेव्हा मला असा मुलगा भेटेल ज्याच्यावर मी पूर्ण विश्वास टाकू शकेन, तेव्हाच मी लग्न करेन. हा निर्णय घाईत घ्यायचा नाही, असं माझं ठरलं आहे.”
advertisement
5/7
श्रियाने एक खूप मजेशीर किस्सा सांगितला. ती म्हणाली, “माझे आई-वडील मला नेहमी म्हणतात की, जर तुला लग्नच करायचं नसेल, तरी आम्ही तुझ्यासोबत आहोत. पण, जर करायचं असेल, तर असं समजू नकोस की, एखादा मुलगा चित्रपटासारख्या नाट्यमय पद्धतीने तुझ्यासमोर येऊन उभा राहील.”
advertisement
6/7
आई-वडिलांनी पुढे तिला विचारलं, ‘हे फक्त सिनेमातच चांगलं वाटतं. जर असं काही आपोआप झालं नाही तर तुलाही थोडे प्रयत्न करावे लागतील. तर त्यांनी मला विचारलं की तू तसे प्रयत्न करत आहेस का?’
advertisement
7/7
यावर श्रिया हसली आणि म्हणाली, “अनेकदा लोक म्हणतात की, तुम्ही जेव्हा प्रयत्न करत नसता, तेव्हा तुम्हाला अचानक कोणीतरी भेटतं. म्हणूनच मी नेहमी खाली बघून चालते, म्हणजे मी त्याचा शोध घेत नाहीये, असं दाखवते.”
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Shriya Pilgaonkar : लग्नाबद्दल पहिल्यांदाच स्पष्ट बोलली श्रिया पिळगांवकर, 'आईबाबांनी सांगितलंय, लग्न करायचं नसेल तर...'