'ज्या दिवशी धरम पाजी गेले, त्या दिवशी माझे वडील...', Bigg Boss 19 चा ग्रँड फिनालेमध्ये सलमान खानला अश्रू अनावर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
बिग बॉस 19च्या ग्रँड फिनालेमध्ये सलमान खान दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्या आठवणीत भावूक झाला. सलमान खानला अश्रू अनावर झाले.
advertisement
1/9

बिग बॉस 19 चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. अभिनेता गौरव खन्ना या सीझनचा विजेता झाला. ग्रँड फिनालेमध्ये अभिनेता सलमान खान धर्मेंद्र यांच्या आठणीत इमोशनल झाला. सलमान स्टेजवरच रडू लागला.
advertisement
2/9
24 नोव्हेंबर 2025 रोजी धर्मेंद्र यांचं निधन झालं. सलमान खानने त्याच्या अंत्यविधीला हजेरी लावली होती. त्यानंतर सलमान खान पहिल्यांदा बिग बॉस 19 च्या मंचावर पहिल्यांदा व्यक्त झाला. बिग बॉस 19च्या ग्रँड फिनालेमध्ये अभिनेते धर्मेंद्र यांना ट्रिब्युट देण्यात आला.
advertisement
3/9
अभिनेते धर्मेंद्र बिग बॉस 18मध्ये आले होते. तेव्हा सलमान खानने त्यांना तुम्हाला पुढच्या सीझनमध्ये यायचं आहे असं सांगितलं. त्यावर धर्मेंद्र यांनी येण्याचं पक्क केलं होतं. बिग बॉस 18ची ती क्लिप ग्रँड फिनालेमध्ये दाखवण्यात आली. ती क्लिप पाहून सलमान खानला रडू कोसळलं.
advertisement
4/9
भावूक होत सलमान खान म्हणाला, "आम्ही आमचा ही-मॅन गमावला. आमचा सर्वात अद्भुत माणूस, धर्मेंद्र जी. मला वाटत नाही की धर्मजींपेक्षा चांगला माणूस असू शकतो. ते ज्या पद्धतीने आयुष्य जगले... तो राजेशाही पद्धतीने जगले, मनापासून जगले."
advertisement
5/9
"त्यांनी 60 वर्षे आपलं मनोरंजन केलं. त्यांनी आम्हाला सनी आणि बॉबी, ईशा सारखी मुलं दिली. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तो इंडस्ट्रीमध्ये आल्यापासून अथक परिश्रम करत आहे. त्यांनी सर्व प्रकारच्या भूमिका केल्या आहेत, विनोदी, अ‍ॅक्शन."
advertisement
6/9
सलमान पुढे म्हणाला, "माझी कारकीर्द नेहमीच धर्मेंद्रजींच्या भूमिकेतून गेली आहे. त्यांचा एक निष्पाप चेहरा आणि एक ही मॅन शरीरयष्टी. त्यांनी अविरत मनोरंजन केलं. आम्ही त्यांना नेहमीच लक्षात ठेवू. प्रेम आहेत धरम पाजी."
advertisement
7/9
धर्मेंद्र यांचं निधन झालं त्या दिवशी सलमानचे वडील सलीम खान यांचा वाढदिवस होता. याविषयी बोलताना सलमान म्हणाला, "सर्वात मोठी गोष्ट म्हणजे 24 नोव्हेंबर रोजी त्यांचे निधन झालं. त्या दिवशी माझ्या वडिलांचा वाढदिवस होता आणि उद्या ( 8 डिसेंबर 2026 )त्यांचा ( धर्मेंद्र यांचा ) आणि माझ्या आईचाही."
advertisement
8/9
"जर मला असं वाटत असेल तर कल्पना करा की सनी आणि त्याच्या कुटुंबाला काय सहन करावं लागत असेल. इतक्या सन्मानानं दोन अंत्यसंस्कार पार पडले. सूरज बडजात्याची आई आणि धरमजी यांचे."
advertisement
9/9
"त्यांनी त्यांच्या प्रार्थना सभा इतक्या कृपेने आणि आदराने पार पाडल्या. सगळे रडत होते पण तरीही एक शिस्त होती. त्यांचा जीवनाचा उत्सव होता. बॉबी आणि सनी यांना सलाम. प्रत्येक अंत्यसंस्कार आणि प्रार्थना सभा इतक्या सुंदरतेनं पार पडली पाहिजे."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'ज्या दिवशी धरम पाजी गेले, त्या दिवशी माझे वडील...', Bigg Boss 19 चा ग्रँड फिनालेमध्ये सलमान खानला अश्रू अनावर