TRENDING:

Samantha Prabhu Marriage : 'भूत शुद्धी विवाह' म्हणजे काय? समंथानं याच पद्धतीनं केलं बॉयफ्रेंडसोबत लग्न

Last Updated:
अभिनेत्री समांथाने गुपचूप लग्न केलं. तिच्या दुसऱ्या लग्नात फक्त 30 लोकांची हजेरी होती. समांथाचं लग्न हे साधं सुधं नव्हतं.
advertisement
1/9
'भूत शुद्धी विवाह' म्हणजे काय? समंथानं याच पद्धतीनं केलं बॉयफ्रेंडसोबत लग्न
अभिनेत्री समंथा रूथ प्रभू आणि दिग्दर्शक राज निदिमोरू यांचा विवाह कोइम्बतूर येथे लग्न केलं. समांथाने नागा चैतन्यबरोबर डिवोर्सच्या चार वर्षांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली. समांथा आणि राज या दोघांचंही हे दुसरं लग्न आहे. समांथाच्या लग्नात  फक्त काही जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते.
advertisement
2/9
समांथा आणि राज यांचं हे दुसरं लग्न काही साधं सुधं नव्हतं. दोघांनी एका विशिष्ट पद्धतीनं लग्न केलं आहे. समांथा आणि राज यांनी कोइम्बतूर येथील ईशा योग केंद्रात प्राचीन योगिक परंपरेनुसार लग्न केलं पडला.
advertisement
3/9
'भूत शुद्धी विवाह' या अनोख्या विधीनुसार दोघांचं लग्न झालं. 'भूत शुद्धी विवाह' म्हणजे काय असतं आणि समांथाने तो काल केला?
advertisement
4/9
'भूत शुद्धी विवाह'मध्ये लिंग भैरवी साक्षीदार होते. या विशेष विधीमध्ये जोडप्यातील पाच घटक  पृथ्वी, पाणी, अग्नी, वायु आणि अवकाश  यांची शुद्धी केली जाते. यामुळे जोडप्यांमध्ये केवळ विचार किंवा भावनांपुरतेच नाही, तर ऊर्जा स्तरावरही खोल बंधन निर्माण होतात.
advertisement
5/9
'भूत शुद्धी विवाह' लिंग भैरवी किंवा निवडक ठिकाणीच केला जातो. पाच घटकांची शुद्धी जोडप्याच्या नात्याला अधिक शुद्ध, मजबूत बनवते आणि त्यांच्या वैवाहिक प्रवासात आनंद, शांती, समृद्धी आणि आध्यात्मिक संतुलन मिळावे यासाठी हा विधी केला जातो.
advertisement
6/9
विवाहानंतर ईशा फाउंडेशनने समंथा आणि राज यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांना देवीचे अविरत आशीर्वाद आणि सकारात्मक ऊर्जा मिळो अशा शुभेच्छाही देण्यात आल्या.
advertisement
7/9
लिंग भैरवी हे ईश्वरी स्त्रीत्वाचे उग्र आणि करुणामय रूप असून सद्गुरू यांनी ईशा योग केंद्रात प्राण प्रतिष्ठाद्वारे स्थापित केले आहे. ही ऊर्जा जीवन समृद्ध करण्यास मदत करतं आणि जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक टप्प्यावर भक्तांना आधार देतं. शरीर, मन आणि ऊर्जा स्थिर करण्यास ते उपयुक्त ठरतं.
advertisement
8/9
ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू यांनी सांगितलं की,  भावी पिढ्यांचे जीवन विवाहाच्या पवित्र बंधावर अवलंबून असते. आनंदी विवाहासाठी विवाह प्रक्रिया शुद्धता आणि सन्मानाने केली जाणं अत्यावश्यक आहे.
advertisement
9/9
भूत शुद्ध विवाह ही अशा प्रक्रियेची पायाभूत पद्धत असून यात जोडप्यांना एकत्र बांधण्यासाठी पाच घटकांची शुद्धी केली जाते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Samantha Prabhu Marriage : 'भूत शुद्धी विवाह' म्हणजे काय? समंथानं याच पद्धतीनं केलं बॉयफ्रेंडसोबत लग्न
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल