TRENDING:

Samantha Ruth Prabhu च्या दुसऱ्या लग्नानंतर EX पती नागा चैतन्यची पहिली रिअ‍ॅक्शन समोर, दिसला इंटेन्स लुक

Last Updated:
Naga Chaitanya Post : दाक्षिणात्य सुपरस्टार समंथा रुथ प्रभू आणि 'द फॅमिली मॅन'चे दिग्दर्शक राज निदिमोरू विवाहबंधनात अडकले आहेत. काही दिवसांपासून दोघे रिलेशनमध्ये होते. आता समंथाच्या दुसऱ्या लग्नानंतर एक्स पती नागा चैतन्यची फर्स्ट रिअॅक्शन समोर आली आहे.
advertisement
1/7
समंथाच्या दुसऱ्या लग्नानंतर EX पती नागा चैतन्यची पहिली रिअ‍ॅक्शन समोर
दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आपल्या व्यावसायिक कामांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. समंथा रुथ प्रभू आणि 'द फॅमिली मॅन'चे दिग्दर्शक राज निदिमोरू गुपचुप विवाहबंधनात अडकले आहेत. सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.
advertisement
2/7
समंथा आणि राज यांच्यावर सध्या सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान समंथाचा एक्स पती नागा चैतन्यच्या नव्या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याची ही पोस्ट म्हणजे समंथाच्या लग्नाबद्दलची त्याची प्रतिक्रिया असल्याचं म्हटलं जात आहे.
advertisement
3/7
नागा चैतन्यने सोशल मीडियावर आपल्या आगामी 'धूता' या चित्रपटातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये नागा चैतन्यचा इंटेन्स लुक पाहायला मिळत आहे. नागा चैतन्यने फोटो शेअर करत लिहिलं आहे,"धूता' हा एक असा शो आहे जो अभिनेत्याला तुमची क्रिएटिव्हिटी आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर प्रेक्षकांसोबत जोडून ठेवण्याचा प्रयत्न करतो. प्रेक्षक तुमच्याकडून तुमची एनर्जी घेतात आणि त्यांची एनर्जी परत तुम्हाला देतात".
advertisement
4/7
समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. डेटिंगनंतर 2017 मध्ये ते लग्नबंधनात अडकले. पण त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर 2021 मध्ये ते विभक्त झाले. सोशल मीडियावर घटस्फोटाची बातमी शेअर करत त्यांनी चाहत्यांना मोठा धक्का दिला होता.
advertisement
5/7
नागा चैतन्यच्या या पोस्टवर काय टायमिंग आहे, सॅमशिवाय तुझं आयुष्य अपूर्ण आहे, समंथाने लग्न केलं म्हणून तुला राग आलाय ना, समंथाच्या लग्नामुळे तू अशी टिपिकल पोस्ट केली आहेस ना, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
advertisement
6/7
समंथा रुथ प्रभूपासून विभक्त झाल्यानंतर नागा चैतन्य 4 डिसेंबर 2024 रोजी शोभिता धुलिपालासोबत विवाहबंधनात अडकला. नागा चैतन्यच्या वेडिंग अॅनिव्हर्सला 3 दिवस बाकी असताना समंथाने लग्न केलं आहे.
advertisement
7/7
समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी एकमेकांचा आदर करत घटस्फोट घेतला होता. घटस्फोटानंतर समंथाला अनेक अफवांचादेखील सामना करावा लागला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Samantha Ruth Prabhu च्या दुसऱ्या लग्नानंतर EX पती नागा चैतन्यची पहिली रिअ‍ॅक्शन समोर, दिसला इंटेन्स लुक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल