TRENDING:

Samantha Husband Property : 12 वर्षांनी मोठ्या डायरेक्टरसोबत थाटला संसार, कोट्यवधींचा मालक आहे समांथाचा दुसरा नवरा, कितीये संपत्ती?

Last Updated:
Raj Nidimoru Net Worth : अभिनेत्री समांथा तर कोट्यवधींची मालकीण आहे. तिचा दुसरा नवरा फॅमिली मॅनचा डायरेक्टर राजकडे मोठी संपत्ती आहे.
advertisement
1/8
कोट्यवधींचा मालक आहे समांथाचा दुसरा नवरा, किती आहे राजची संपत्ती?
समंथा रूथ प्रभूने तिचा बॉयफ्रेंड आणि 'द फॅमिली मॅन'चा डायरेक्टर राज निदिमोरू यांनी 1 डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली. समांथाचं राजबरोबर हे दुसरं लग्न होतं. दोघांंनी गुपचूप लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाची माहिती समोर आल्यानंतर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.
advertisement
2/8
समांथाचं पहिलं लग्न अभिनेता नागा चैतन्यबरोबर झालं होतं. पण काही वर्षांत त्यांचा डिवोर्स झाला. नागा चैतन्यसोबत डिवोर्स झाल्यानंतर चार वर्षांनी समांथाने राज निदिमोरूशी दुसरं लग्न केलं. राज आणि समांथा अनेक महिन्यांपासून रिलेशनमध्ये होते. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं.
advertisement
3/8
समांथा तर साऊथची सध्याची टॉपची आहे. समांथा नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते. समांथाने आजवर अनेक सिनेमात दमदार भूमिका साकारून आपलं नाव कमावलं त्याचबरोबर पैसाही कमावला. समांथा तर कोट्यवधींची मालकीण आहे. समांथाचा दुसरा नवरा राजची संपत्ती देखील काही कमी नाही. समांथा की राज, संपत्तीच्या बाबतीत कोण सर्वात श्रीमंत आहे?
advertisement
4/8
राज निदिमोरू हा प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. राज मुंबईतील एका प्रतिष्ठित इमारतीत एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहतो. त्याच्याकडे महागड्या गाड्या आहेत. चित्रपट, ओटीटी प्रोजेक्ट आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून त्याची मुख्य कमाई होते. राज लग्झरी आयुष्य जगतो. त्याच्या संपत्तीचा थेट आकडा अद्याप समोर आलेला नाही. 
advertisement
5/8
समंथा रूथ प्रभूने 2010 मध्ये 'विनैथांडी वरुवाया' या तमिळ सिनेमातून पदार्पण केले. त्याच वर्षी रोमँटिक थ्रिलर 'ये माया चेसावे' या सिनेमानं तिला प्रसिद्ध मिळवून दिली. तिने तिचा एक्स नवरा नागा चैतन्यबरोबरही अनेक हिट सिनेमात काम केलं आहे.
advertisement
6/8
समांथाने मोठ्या पडद्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवरही आपली जादू दाखवली समांथा गेली 15 वर्ष अभिनय क्षेत्रात काम करतेय. समंथा जवळपास 101 कोटी रुपयांची मालकीण आहे. समांथा सिनेमाशिवाय ब्रँड एंडोर्समेंट, जाहिरातींमधूनही मोठी कमाई करते.
advertisement
7/8
इंडिया टाईम्सच्या वृत्तानुसार, समांथा एका सिनेमासाठी जवळपास 3-5 कोटी रुपये मानधन घेते. ब्रँड एंडोर्समेंटमधून ती दरवर्षी सुमारे 8 कोटी रुपये कमावते. समांथाची मुंबईत 10-15 कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे. शिवाय समांथाकडे आलिशान गाड्या देखील आहेत.
advertisement
8/8
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2025 मध्ये राज निदिमोरूची एकूण संपत्ती सुमारे 83 - 85 कोटी इतकी आहे. 'द फॅमिली मॅन', 'गो गोवा गॉन', 'फरझी' सारखे अनेक हिट सिनेमे त्याच्या नावे आहेत. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Samantha Husband Property : 12 वर्षांनी मोठ्या डायरेक्टरसोबत थाटला संसार, कोट्यवधींचा मालक आहे समांथाचा दुसरा नवरा, कितीये संपत्ती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल