TRENDING:

ऐश्वर्या रायपेक्षा युनिक समंथा रुथ प्रभुची स्पेशल वेडिंग रिंग, काय आहे असं स्पेशल? किंमत ऐकूण व्हाल शॉक

Last Updated:
Samantha Ruth Prabhu Wedding Ring : समंथा रुथ प्रभू आणि 'द फॅमिली मॅन'चे दिग्दर्शक राज निदिमोरू नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. पण सध्या समंथाच्या वेडिंग रिंगने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
advertisement
1/7
ऐश्वर्या रायपेक्षा युनिक समंथा रुथ प्रभुची स्पेशल वेडिंग रिंग, काय आहे स्पेशल?
अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि 'द फॅमिली मॅन'चे दिग्दर्शक राज निदिमोरू नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. कोयंबटूर येथील मंदिरात त्यांचा लग्नसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण या सगळ्या फोटोंमध्ये लक्ष वेधून घेतेय ती समंथा रुथ प्रभूची वेडिंग रिंग.
advertisement
2/7
समंथा रुथ प्रभूची मोठी आणि अनोखी वेडिंग रिंग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नेहमीच बोल्डनेसमुळे चर्चेत असणाऱ्या समंथा रुथ प्रभूने आपल्या लग्नातील साधेपणाने मात्र चाहत्यांचं चांगलच लक्ष वेधून घेतलं आहे.
advertisement
3/7
समंथाची वेडिंग रिंग खूपच रेअर कलेक्टर डायमंड्स पीसपासून बनवण्यात आली होती. या वेडिंग रिंगमध्ये 2 कॅरेट एक लोजेंज पोर्ट्रेट कट डायमंड आहे. पक्ष्याच्या पंख्याच्या पंखासारख्या आकारच्या चारही बाजू आहेत. एकूण आठ कस्टम पोर्ट्रेट डायमंड या अंगठीत वापरण्यात आले आहेत. या अंगठीवर बारीक नक्षीकाम करण्यात आले आहे. जगात खूप कमी ठिकाणी अशा पद्धतीची अंगठी बनवण्यात येते.
advertisement
4/7
समंथा रुठ प्रभूची अंगठी दिसायला प्लॅस्टिकची वाटत असली तरी खूप किंमती आहे. या वेडिंग रिंगची किंमत 1.5 कोटी रुपयांच्या आसपास असू शकते. ही अंगठी पूर्णपणे एक स्टेटमेंट पीस आहे.
advertisement
5/7
बोल्ड, मॉडर्न आणि एकदम युनिक अशी समंथा रुठ प्रभूची वेडिंग रिंग आहे. आजवर एकाही सेलिब्रिटीने अशापद्धतीची वेडिंग रिंग घातलेली नसेल. त्यामुळे ऐश्वर्या रायपेक्षीही समंथा रुठ प्रभूची वेडिंग रिंग यूनिक असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.
advertisement
6/7
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, MISSHK फाइन ज्वेलरीच्या संस्थापक हफ्सा कुरैशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, समंथाची वेडिंग रिंगमध्ये पोर्ट्रेट-कट डायमंडचा वापर करण्यात आला आहे. मध्यभागी एक मोठा डायमंड आणि चारही बाजुंनी पश्यांच्या पंखाप्रमाणे पसरलेले कस्टम कट डायमंड".
advertisement
7/7
हफ्सा कुरैशी म्हणाल्या की,"अशा पद्धतीची अंगठी बनवण्याआधी कारागिराला सर्वात आधी डिझाइन काढावी लागते. या प्रक्रियेला खूप वेळ लागतो. पोर्ट्रेट-कट डायमंड खूप बारीक आणि फ्लॅट असतो. फक्त कस्टम डिजाइनसाठी या डायमंडचा वापर होतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ऐश्वर्या रायपेक्षा युनिक समंथा रुथ प्रभुची स्पेशल वेडिंग रिंग, काय आहे असं स्पेशल? किंमत ऐकूण व्हाल शॉक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल