संजय मोने-सुकन्या कुलकर्णीचं लग्न लागताना मंडपाबाहेर उभे होते पोलीस, काय होतं कारण?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Sanjay Mone Sukanya Kulkarni : संजय मोने आणि सुप्रिया कुलकर्णी-मोने यांचं लग्न लागताना मंडपाबाहेर 25 पोलीस उभे होते.
advertisement
1/8

संजय मोने आणि सुकन्या मोने 1998 मध्ये विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नसोहळ्याची चांगलीच चर्चा झाली. आजही मराठी सेलिब्रिटींमध्ये त्यांच्या हटके लग्नसोहळ्याची चर्चा होत असलेली पाहायला मिळते. सुकन्या कुलकर्णी यांच्यासारखी सोज्वळ मुलगी संजय मोने यांच्या प्रेमात पडली याचं संपूर्ण मराठी इंडस्ट्रीला आश्चर्य वाटलं होतं.
advertisement
2/8
विनय आपटे यांनी तर सुकन्या कुलकर्णी यांना 'निखारा पदरात घेऊन लग्न करणार आहेस, विचार कर!' असा सल्लाही दिला होता. सुकन्या कुलकर्णी आणि संजय मोने यांचं लग्न 25 दिवस तरी टिकेल असं कोणालाच वाटलं नव्हतं.
advertisement
3/8
सुकन्या कुलकर्णी काही दिवसांपूर्वी आपल्या लग्नाबद्दल म्हणाल्या होत्या,"मला सगळ्यांनी हे लग्न करू नकोस म्हणून सल्ले दिले होते. त्यांना कोणालाच वाटलं नव्हतं की आमचं लग्न 25 वर्ष टिकेल. साधे 25 दिवसही टिकेल की नाही याबाबत त्यांना शंका होती. मुळात लग्न लागताना बाहेर पोलीस उभे होते. कारण तो कधीही पळून जाऊ शकतो हे आम्हाला माहीत होतं".
advertisement
4/8
सुकन्या कुलकर्णी-मोने म्हणाल्या,"संजयने मला सांगितलं होतं की एका तासात विधी आटोपणार आहेत का? नाहीतर रजिस्टर लग्न कर. पण मला रजिस्टर लग्नात अजिबात इंटरेस्ट नव्हता. एक तास 5 मिनिटं झाली तरी मी निघून जाईल अशी तंबीच संजय कडून मिळाली होती. तेवढ्या वेळात सगळे महत्त्वाचे विधी पटापट आटोपून घे मग नंतर काहीही येऊ दे . या अटीमुळे सप्तपदीला त्याच्या स्पीडने झपझप फेऱ्या मारल्या. या सगळ्या गोंधळात माझ्याच ताईने आठ फेऱ्या झाल्यात म्हणून आम्हाला थांबवलं. आणि आता एक उलटी फेरी मारा म्हणून मागे फिरायला लावलं".
advertisement
5/8
सुकन्या कुलकर्णी आणि संजय मोने यांनी तामझाम न करता अत्यंत साधेपणाने लग्न केलं होतं. विशेष म्हणजे लग्नात त्यांनी एकही फोटो काढला नाही.
advertisement
6/8
लग्नानंतर सुकन्या मोने आणि संजय मोने यांनी एका मालिकेत एकत्र काम केलं. या मालिकेतील लग्नाच्या सीनदरम्यान त्यांनी एकत्र फोटो काढला. हाच लग्नातला फोटो समजून त्यांनी तो अजूनही जपून ठेवला आहे.
advertisement
7/8
सुकन्या मोने आणि संजय मोने यांच्या लग्नात वऱ्हाडी मंडळींना भाकरी भाजी असं साधं जेवण देण्यात आलं होतं. हा मेन्यू संजय मोने यांनीच ठरवला होता.
advertisement
8/8
सुकन्या मोने आणि संजय मोने यांच्या लग्नाला आज 25 वर्षे झाली आहेत. पण अजूनही त्यांचा संसार उत्तम सुरू आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
संजय मोने-सुकन्या कुलकर्णीचं लग्न लागताना मंडपाबाहेर उभे होते पोलीस, काय होतं कारण?