TRENDING:

वडापाव नव्हे, हे होतं शम्मी कपूर यांचं फेव्हरेट स्ट्रीट फूड, माटुंग्यात येऊन मारायचे ताव

Last Updated:
Shammi Kapoor Favorite Street Food : शम्मी कपूर हे एक उत्तम खवय्ये होते. फेव्हरेट स्ट्रीट फूड खाण्यासाठी ते खास मुंबईतील माटुंग्यात येत असे.
advertisement
1/7
शम्मी कपूर यांचं फेव्हरेट स्ट्रीट फूड काय? माटुंग्यात येऊन मारायचे ताव
बॉलिवूडमधील सर्वात मोठे खानदान किंवा सिनेसृष्टीला सर्वाधिक सुपरस्टार देणारे खानदान म्हणून कपूर घराणे ओळखले जाते. पृथ्वीराज कपूर यांच्यापासून राज कपूर, शम्मी कपूर, शशि कपूर आणि आजच्या घडीला करीना आणि रणबीरपर्यंत या कुटुंबाने इंडस्ट्रीला अनेक सुपरस्टार्स दिले आहेत.
advertisement
2/7
कपूर कुटुंबातील प्रत्येकाला खाण्या-पिण्याची प्रचंड आवड आहे. कपूर घराण्यातील शम्मी कपूर हे एक उत्तम खवय्ये होते. फेव्हरेट स्ट्रीट फूड खाण्यासाठी ते खास मुंबईतील माटुंग्यात येत असे.
advertisement
3/7
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते शम्मी कपूर यांचं जेवढं आपल्या कामावर, अभिनयावर प्रेम होतं. तेवढंच प्रेम ते खाण्यावरदेखील करत असे.
advertisement
4/7
स्ट्रीट फूड म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो मुंबईचा 'वडापाव'. पण शम्मी कपूर यांचं फेव्हरेट स्ट्रीट फूड वडापाव कधीच नव्हतं.
advertisement
5/7
पृथ्वीराज कपूर यांची लेक उर्मिला सियालचा मुलगा आणि कपूर कुटुंबाचा सदस्य अभिनेता जतिन कपूरने नुकतंच एका मुलाखतीत एक किस्सा शेअर केला आहे. जतिन कपूरने आपला मामा शम्मी कपूर यांच्या फेव्हरेट स्ट्रीट फूडबाबत भाष्य केलं आहे.
advertisement
6/7
शम्मी कपूर जेव्हा पृथ्वीराज कपूर यांच्या मुंबईतील माटुंग्यातील घरी यायचे. त्यावेळी एक पाणीपुरीवाला पाणीपुरीचा ठेला घेऊन त्यांच्या घरी येत असे. पाणीपुरीच्या एका प्लेटमध्ये सहा पुऱ्या असे. पण शम्मी कपूर मात्र एकाचवेळी 20 पुऱ्या फस्त करायचे.
advertisement
7/7
शम्मी कपूर यांना दहीपूरी प्रचंड आवडत असे. जतिन म्हणाला,"शम्मी कपूर एकाचवेळी एवढी पाणीपुरी खात असे की त्यांना नंतर आठवडाभर पाणीपुरी नको असे. पुढे त्या पाणीपुरी वाल्याने 'शम्मी साहब स्पेशल' म्हणून एक खास डिश सुरू केली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
वडापाव नव्हे, हे होतं शम्मी कपूर यांचं फेव्हरेट स्ट्रीट फूड, माटुंग्यात येऊन मारायचे ताव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल