सुनील शेट्टींची या मराठी अभिनेत्रीसाठी खास पोस्ट, म्हणाले,'डिसेंबरमध्येच येणार...'
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Suniel Shetty : सुनील शेट्टी यांनी मराठमोळ्या अभिनेत्रीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. त्यांची इंस्टा स्टोरी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
advertisement
1/7

सुनील शेट्टी सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळे चर्चेत आहेत. त्यांचा मुलगा आहान शेट्टी मराठमोळी अभिनेत्री जिया शंकर हिला डेट करत असल्याची चर्चा आहे. तसेच लवकरच आहान आणि जिया लग्नबंधनात अडकणार असल्याचंही म्हटलं जात आहे.
advertisement
2/7
सुनील शेट्टी यांनी आता मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. सायलीला आपल्या आगामी चित्रपटासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
advertisement
3/7
सुनील शेट्टी यांनी सायली संजीवच्या आगामी 'कैरी' या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये लिहिलं आहे की,"स्वत:चे आकाश शोधायला निघालेली...'कैरी'. यंदा डिसेंबरमध्येच कैरी येणार... 12 डिसेंबरपासून चित्रपटगृहात".
advertisement
4/7
'कैरी'च्या पोस्टरमध्ये सायली संजीव, सिद्धार्थ जाधव, सुबोध भावे आणि शशांक केतकर हे कलाकार दिसत आहेत. या बहुचर्चित चित्रपटाची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.
advertisement
5/7
सायली संजीवने याआधी आपला एक ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटो शेअर करत 'Stay Tuned' असं कॅप्शन लिहिलं होतं. त्यामुळे सायली चाहत्यांसोबत आपलं लग्न, साखरपुड्याची बातमी शेअर करणार का? असा प्रश्न उपस्थित होत होता. पण सायलीने मात्र आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.
advertisement
6/7
सुनील शेट्टी सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय आहेत. आता ते आपल्या मुलाच्या लग्नाची कधी अधिकृत घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
advertisement
7/7
सुनील शेट्टी नेहमीच मराठी कलाकारांसाठी पोस्ट शेअर करताना दिसून येतात. अण्णांचा पाठिंबा मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांसाठी खूप महत्त्वाचा असतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सुनील शेट्टींची या मराठी अभिनेत्रीसाठी खास पोस्ट, म्हणाले,'डिसेंबरमध्येच येणार...'