ऐन लग्नात बिघडली होती सूरज चव्हाणची तब्येत, फॅन लोकांची गर्दी पाहून बसलेला धक्का; म्हणाला, 'अख्खांसोबत फोटो काढेन पण...'
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Suraj Chavan : सूरज चव्हाणला लग्नात दम्याचा त्रास झाल्याचं समोर आलं आहे. लग्नात प्रचंड गर्दी उसळल्याने सूरजला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे.
advertisement
1/7

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. मोठ्या थाटामाटात पुण्यातील सासवड याठिकाणी सूरजला लग्नसोहळा पार पडला. लग्नाची पत्रिका व्हायरल झाल्याने लाडक्या 'गुलीगत किंग'च्या लग्नात चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
advertisement
2/7
सूरजच्या लग्नासाठी संपूर्ण महाराष्ट्र उत्सुक होता. त्याच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लाखो चाहत्यांनी त्याच्या विवाहस्थळी प्रचंड गर्दी केली. सूरजच्या लग्नात हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांसह राजकीय मंडळीदेखील उपस्थित राहणार होते. पण काही कारणाने त्यांना उपस्थित राहता आलं नाही. पण चाहत्यांनी मात्र सूरजचं लग्न चांगलच गाजवलं.
advertisement
3/7
सूरजच्या लग्नात तब्बल 50 बॉडीगार्डचा बंदोबस्त करण्यात आला होता. लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या विशेष बंदोबस्तचं आयोजन करण्यात आलं होतं. लग्नमंडपात विशेष झोन, प्रवेशद्वार आणि VIP गेस्ट अशा सर्व ठिकाणी हे बॉडीगार्ड ठेवण्यात आले होते. पण चाहत्यांच्या या तुफान गर्दीसमोर हा बंदोबस्त कमी पडलेला पाहायला मिळत आहे.
advertisement
4/7
सूरज चव्हाणला दम्याचा त्रास आहे. 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वातही सूरज आपल्या आजाराबाबत बोलताना दिसून आला आहे. लग्नात गर्दी उसळल्याने सूरजचा दम्याचा त्रास वाढला होता. त्यामुळे लग्नमंडपातून तो काही काळ हॉलमधील एका खोलीत गेला होता.
advertisement
5/7
सूरज चव्हाणचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सूरज आपल्या त्रासाबद्दल बोलत असताना चाहत्यांना कळकळीची विनंती करताना दिसत आहे. सूरज चव्हाण माईकवरुन चाहत्यांना सांगतोय,"हॅलो, तुमच्या सगळ्यांचा लाडका टॉपचा किंग सूरज चव्हाण. तुम्ही सर्व माझ्या लग्नासाठी एवढ्या दूर आलात. त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो".
advertisement
6/7
सूरज चव्हाण पुढे म्हणतोय,"फक्त मला सहकार्य करा. कारण तुम्हा सर्वांना माहिती आहे की मला दम्याचा त्रास आहे. मी सर्वांसोबत फोटो काढेन. पण आता लग्न होऊदेत". चाहत्यांना विनंती केल्यानंतरच सूरज चव्हाण लग्नमंडपात आला. अचानक गर्दी उसळल्याने दोन तास उशिरा सूरजचं लग्न लागलं.
advertisement
7/7
सूरज चव्हाणला दम्याचा त्रास आहे. त्यामुळे अनेकदा श्वास घ्यायला त्याला त्रास होतो. सूरजच्या लग्नातील अती गर्दीमुळे 'किलर गर्ल' जान्हवी किल्लेकरदेखील संतापली होती. भर मंडपात आलेल्या पाहुण्यांना सुनावताना जान्हवी दिसून आली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ऐन लग्नात बिघडली होती सूरज चव्हाणची तब्येत, फॅन लोकांची गर्दी पाहून बसलेला धक्का; म्हणाला, 'अख्खांसोबत फोटो काढेन पण...'