TRENDING:

17 वर्षांत 10 बड्या कलाकारांचा 'तारक मेहता'ला रामराम, मालिका सोडल्यानंतर आता ते करतात काय?

Last Updated:
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आतापर्यंत तब्बल 10 कलाकारांनी सोडली आहे.
advertisement
1/10
17 वर्षांत 10 बड्या कलाकारांचा 'तारक मेहता'ला रामराम, आता ते करतात काय?
दयाबेन : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचं नाव निघालं की डोळ्यासमोर येते ती दयाबेन. 2008 पासून अभिनेत्री दिशा वकानी या मालिकेत दयाबेन ही भूमिका साकारत आहे. पण प्रेग्नंसीच्या कारणाने तिने 2017 मध्ये ही मालिका सोडली. 2017 पासून दयाबेनचे चाहते तिच्या परत येण्याची प्रतीक्षा करत आहेत. दयाबेन आता आपल्या संसारात रमली आहे.
advertisement
2/10
टप्पू : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील आणखी एक लोकप्रिय पात्र म्हणजे टप्पू. भव्य गांधी 2008 ते 2017 पर्यंत या मालिकेत टप्पूच्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत होता. पण पुढे मालिकेतून ब्रेक घेत त्याने सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
advertisement
3/10
टप्पू : भव्य गांधीने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका सोडल्यानंतर राज अनादकने 'टप्पू'च्या भूमिकेला न्याय दिला. पण 2022 मध्ये त्यानेही ही मालिका सोडली. आज त्याचं स्वत:चं युट्यूब चॅनल आहे.
advertisement
4/10
मिस्टर तारक मेहता : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत मिस्टर तारक मेहता ही भूमिका साकारणाऱ्या शैलेश लोढा यांचे निर्मात्यांसोबत वाद मतभेद झाले आणि त्यांनी 2008 पासून करत असलेली ही मालिका सोडली. सध्या ते अभिनयक्षेत्रापासून दूर आहेत.
advertisement
5/10
मिसेज तारक मेहता : नेहा मेहता 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत मिसेस तारक मेहता ही भूमिका साकारत होती. पण 2020 मध्ये काही कारणाने तिने ही मालिका सोडली आणि गुजराती थिएटरकडे आपला मोर्चा वळवला.
advertisement
6/10
मिस्टर सोढी : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत मिस्टर सोढी ही भूमिका साकारणाऱ्या गुरुचरण सिंहने 2020 मध्ये ही मालिका सोडली. गुरुचरण सध्या अभिनयापासून दूर असून स्वत:चं युट्यूब चॅनल चालवतो.
advertisement
7/10
रिटा रिपोर्टर : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत रिटा रिपोर्टरची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं याच शोचे दिग्दर्शक मालव रजदा यांच्यासोबत लग्न झालं. सध्या ती कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसते. 2022 मध्ये तिने ही मालिका सोडली.
advertisement
8/10
सोनू : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत झील मेहता 2008 पासून भिडेच्या मुलीची सोनूची भूमिका साकारत आहे. 2012 पर्यंत ती या मालिकेचा भाग होती. पण आता ती मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करतेय.
advertisement
9/10
सोनू : झील मेहताने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका सोडल्यानंतर तिच्याजागी निधी भानुशाली हे पात्र साकारू लागली. पुढे 2019 मध्ये तिने ही मालिका सोडली. निधी अभिनयक्षेत्रापासून दूर असून ट्रॅव्हलर म्हणून काम करते.
advertisement
10/10
जेनिफर मिस्त्री : 'तारक मेहता का चष्मा' या मालिकेत जेनिफर मिस्त्री मिसेस सोढी ही भूमिका साकारत आहे. पण असित मोदींवर गंभीर आरोप करत तिने काही वर्षांपूर्वी ही मालिका सोडली. जेनिफर मिस्त्री सध्या फक्त सोशल मीडियावर सक्रीय आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
17 वर्षांत 10 बड्या कलाकारांचा 'तारक मेहता'ला रामराम, मालिका सोडल्यानंतर आता ते करतात काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल