TRENDING:
Tanya Mittal: घरात लिफ्ट अन् 150 बॉडीगार्ड्स! तान्या मित्तलने हॅक केला 'बिग बॉस'चा कोड, कशी मिळवली Top 5 मध्ये जागा?
Last Updated:
Bigg Boss 19 Tanya Mittal: 'बिग बॉस १९' च्या घरात पहिल्या दिवसापासून वादग्रस्त ठरलेली आणि आध्यात्मिक इन्फ्लुएन्सर म्हणून ओळखली जाणारी तान्या मित्तलला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.
advertisement
1/11
तान्या मित्तलने हॅक केला 'बिग बॉस'चा कोड, कशी मिळवली Top 5 मध्ये जागा?
एका मोठ्या ट्विस्टनंतर, तान्या मित्तल बिग बॉस १९ मधून बाहेर झाली आहे, तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. काही वेळापूर्वीच, अमाल मलिक घराबाहेर आल्याची बातमी होती. त्याने पाचवे स्थान मिळवले.
advertisement
2/11
मुंबई: 'बिग बॉस १९' च्या घरात पहिल्या दिवसापासून वादग्रस्त ठरलेली आणि आध्यात्मिक इन्फ्लुएन्सर म्हणून ओळखली जाणारी तान्या मित्तल टॉप ५ फायनलिस्टपैकी एक आहे.
advertisement
3/11
तुम्हाला ती आवडो अथवा न आवडो, पण तुम्ही तिला दुर्लक्षित करू शकत नाही! 'ती खरी आहे की खोटी?' याच प्रश्नाने तान्याने प्रेक्षकांना तीन महिने गोंधळात पाडलं. अशातच आता प्रेक्षकांना प्रश्न पडला आहे की, या मुलीने शोच्या सिस्टीमलाच हॅक केलंय का?
advertisement
4/11
तान्या मित्तलने घरामध्ये केलेले अनेक दावे इतके मोठे होते की, तिच्या खऱ्या आयुष्याबद्दल लोकांना शंका वाटू लागली. तान्याने सांगितले होते की, तिच्याकडे १५० हून अधिक बॉडीगार्ड्स आहेत, तिचे अनेक व्यवसाय कोट्यवधी रुपयांची उलाढाल करतात आणि तिचे घर स्वर्गापेक्षाही सुंदर असून घरात लिफ्ट्स आहेत.
advertisement
5/11
advertisement
6/11
इतर स्पर्धक शिवीगाळ करणे, पालकांना भांडणात ओढणे यावरून सलमान खानची बोलणी खात असताना, तान्या मात्र शांतपणे 'जय श्रीराम'चा जप करत पुढे जात राहिली.
advertisement
7/11
जसजसे स्पर्धकांनी आणि चाहत्यांनी तिच्या खोटेपणाचे जाळे उलगडण्याचा प्रयत्न केला, तसतसे सोशल मीडियावर गुगलिंग सुरू झाले. कोणी ग्वाल्हेरमध्ये तिचे महालासारखे घर शोधायला गेले, तर कोणी तिच्या जुन्या मॉडेलिंगचे फोटो आणि कॉलेजमधील पार्टीचे व्हिडिओ बाहेर काढले.
advertisement
8/11
हे जुने होताच, तान्याने लगेच राधा कृष्ण आणि 'राजू काजू' च्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. गायक अमाला मलिकसोबतची तिची जवळीक चर्चेत आली, जी नंतर तिने त्याला अचानक 'भैय्या' म्हणून संपवली.
advertisement
9/11
'वाईल्ड कार्ड' स्पर्धक मालती चहरने तान्याचा खोटेपणा उघड करण्याचा प्रयत्न केला, तेव्हाही प्रेक्षकांची उत्सुकता वाढली. सलमान खानने तिला फटकारल्यावरही तिने शांत राहून माफी मागितली आणि कोणाबद्दलही वाईट बोलली नसल्याचा दावा ठामपणे केला.
advertisement
10/11
जर तान्याने तिचे बनावट व्यक्तिमत्व प्रेक्षकांसमोर सादर केले असेल, तरी संपूर्ण शोमध्ये लाईमलाईटमध्ये राहण्याचा तिचा प्लॅन यशस्वी झाला. तिचे दावे वास्तवापासून दूर असले तरी, आत्मविश्वासामुळे तिने ते खरे भासवले.
advertisement
11/11
'घरोघरी' पोहोचलेले हे नाव 'बिग बॉस'मधून बाहेर पडल्यावर एकता कपूरच्या शोची नायिका बनणार आहे. एकता कपूरने तिला ऑफर मिळाल्याची चर्चा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Tanya Mittal: घरात लिफ्ट अन् 150 बॉडीगार्ड्स! तान्या मित्तलने हॅक केला 'बिग बॉस'चा कोड, कशी मिळवली Top 5 मध्ये जागा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल