TRENDING:

Tejashri Pradhan : 24 तासांआधी केलेल्या पोस्टचा चाहत्यांनी काढला भलताच अर्थ, तेजश्री प्रधान म्हणाली, 'तसा कोणताही विचार...'

Last Updated:
Tejashri Pradhan on Serial Exit Rumours : अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने 24 तासांआधी शेअर केलेल्या एका पोस्टचा चाहत्यांनी वेगळाच अर्थ काढला. अखेर तेजश्रीला त्यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं.
advertisement
1/7
24 तासांआधी केलेल्या पोस्टचा चाहत्यांनी काढला भलताच अर्थ, तेजश्री म्हणाली...
अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेत काम करतेय. मालिकेत तिने साकारलेली स्वानंदीची भूमिका प्रेक्षकांना आवडतेय. मालिकेत सध्या स्वानंदी आणि समर यांचं लग्न दाखवण्यात आलं आहे. एक आठवडा प्रेक्षकांना हा भव्य विवाह सोहळा पाहायला मिळणार आहे.
advertisement
2/7
दरम्यान तेजश्री प्रधान वीण दोघांतली ही तुटेना ही मालिका सोडणार आहे अशा चर्चा रंगल्या होत्या. तेजश्रीने 24 तासांआधी केलेल्या एका इन्स्टा पोस्टमुळे या चर्चा रंगल्या होत्या.
advertisement
3/7
तेजश्रीच्या इन्स्टा पोस्टचा चाहत्यांनी भलताच अर्थ काढला. ती पोस्ट पाहून चाहत्यांना तेजश्री आता मालिका सोडणार आहे असं वाटलं. पण अखेर तेजश्रीलाच नवी पोस्ट लिहून स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे.
advertisement
4/7
तेजश्रीने तिच्या आधीच्या पोस्टमध्ये तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ती सोफ्यावर बसली आहे. तिच्या पुढ्यात काही पेपर आहेत. एक माणूस तिला काहीतरी समजावताना दिसत आहे. #newwebseries #newworkinprogress असे हॅशटॅग देत तिने हा व्हिडीओ पोस्ट केला होता.
advertisement
5/7
तेजश्री ओटीटीवरवर दिसणार आहे. नव्या वेब सीरिजच्या कामानिमित्तानं तिने हा व्हिडीओ शेअर केला होता. मात्र तेजश्री आता मालिका सोडणार की काय असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला.
advertisement
6/7
अखेर तेजश्रीने नवीन पोस्ट शेअर करत लिहिलंय, "वीण दोघांतली ही तुटेना ही माझी मालिका सोडण्याचा माझा कुठलाही विचार नाही.... झी मराठीशी असलेली ही वीण तुटणे नाही. लोभ असावा."
advertisement
7/7
तेजश्रीच्या या पोस्टमुळे चाहत्यांना सुटकेचा श्वास सोडला आहे. तेजश्री वीण दोघांतली ही मालिका सोडणार नसून दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Tejashri Pradhan : 24 तासांआधी केलेल्या पोस्टचा चाहत्यांनी काढला भलताच अर्थ, तेजश्री प्रधान म्हणाली, 'तसा कोणताही विचार...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल