Tejaswini Lonari Wedding : एकीकडे केळवण दुसरीकडे मेहंदी, तेजस्विनी लोणारी - समाधानची लगीन घाई, PHOTO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Tejaswini Lonari Wedding : मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आणि शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्या लग्नापूर्वीचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात सुरू झाले आहेत.
advertisement
1/9

मराठी मनोरंजन विश्वात कलाकार बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज झाले आहेत. सूरज चव्हाणनंतर आता प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी लोणारी देखील लग्नबंधनात अकडणार आहे.
advertisement
2/9
मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आणि शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्या लग्नसोहळ्याची धामधूम सुरू झाली आहे. लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. समाधान यांच्याकडे कुटुंबाचं केळवण तर तेजस्विनीकडे मेहंदी सोहळा रंगला आहे.
advertisement
3/9
तेजस्विनी आणि समाधान यांच्या लग्नाला काही दिवस बाकी आहेत. 3 डिसेंबरला दोघांची हळद होणार आहे आणि त्यानंतर 4 डिसेंबरला दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांच्या घरी उत्साहाचं वातावरण आहे.
advertisement
4/9
मेहंदीच्या कार्यक्रमात तेजस्विनीने जांभळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तिच्या हातावर समाधान यांच्या नावाची मेहंदी काढली. लग्नासाठी तेजस्विनीनं दुल्हन मेहंदी हातावर काढली आहे.
advertisement
5/9
तेजस्विनीच्या हात आणि पायांवर खुललेल्या मेहंदीच्या नक्षीमुळे तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं. कार्यक्रमात तेजस्विनीचा लूक, तिची स्मितहास्य ती लग्नासाठी किती उत्साही आणि खूश आहे हे सांगून जात आहे.
advertisement
6/9
तेजस्विनी लोणारी लग्नाआधी 'तुझेच मी गीत गात आहे', 'देवमाणूस', बिग बॉस मराठी 4 सारख्या यांसारख्या शोमधून प्रेक्षकांच्या भेटाली आली होती. तेजस्विनी फक्त अभिनेत्री नव्हे तर ती निर्माती म्हणूनही काम करतेय.
advertisement
7/9
तेजस्विनी ही समाधान सरवणकर यांची पत्नी होणार आहे. समाधान सरवणकर हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते सदा सरवणकर यांचे पुत्र आहेत. राजकीय घराण्यातील मुलगा आणि चित्रसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री या दोघांच्या मिलनाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
advertisement
8/9
साखरपुड्यानंतर काही महिन्यांतच लग्नाची तयारी वेगाने सुरू झाली असून एकीकडे केळवण तर दुसरीकडे मेहंदीचे सोहळे जल्लोषात पार पडत आहेत. तेजस्विनी आणि समाधान त्यांच्या आयुष्यातील नव्या सुंदर प्रवासाला सुरुवात करण्यास पूर्णपणे सज्ज झाले आहेत.
advertisement
9/9
काही दिवसांआधीच तेजस्विनी आणि समाधान यांचा मुंबईत साखरपुडा समारंभ पार पडला होता. दोघांच्या साखरपुड्याला अनेक कलाकारांनीही हजेरी लावली होती. दोघांच्या साखरपुड्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Tejaswini Lonari Wedding : एकीकडे केळवण दुसरीकडे मेहंदी, तेजस्विनी लोणारी - समाधानची लगीन घाई, PHOTO