TRENDING:

'हार्मोन्स वरखाली, 5-7 दिवस...', छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रीचा मासिक पाळीवर संताप, पुरुषांना चांगलंच सुनावलं

Last Updated:
Television Actress : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीने नुकतंच मासिक पाळीबाबत भाष्य केलं आहे. अभिनेत्रीचं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
advertisement
1/7
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रीचा मासिक पाळीवर संताप, पुरुषांना सुनावलं
‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ फेम शगुन शर्मा सध्या डेटिंगच्या चर्चांमुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने नुकतंच ती ऑनस्क्रीन भावाला अर्थात ऋषिक उर्फ अमन गांधीला डेट करत असल्याचं जाहीर केलं आहे. या सुखद वार्तेने शगुनच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
advertisement
2/7
शगुन शर्मा नुकतंच एका पॉडकास्टमध्ये आपल्या लव्ह लाइफबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसून आली. दरम्यान शगुनने मासिक पाळीविषयी मोठे विधान केले आहे.
advertisement
3/7
पिरियड्सबाबत बोलताना शगुन शर्मा म्हणाली,"मुलांना हे माहिती असायला हवे की मुलींना पिरियड्सच्या काळात खूप त्रास होतो. त्यांना हे का माहीत नसते? 5-7 दिवस मुलींची प्रकृती ठीक नसते".
advertisement
4/7
शगुन शर्मा म्हणाली,"मासिक पाळीदरम्यान मुलींचे हार्मोन्स वरखाली होतात, मूड बदलतो, कधी खाण्याची खूप इच्छा होते, तर कधी इच्छात होत नाही. शरीर कमजोर वाटते. हे सगळं माहिती असायला हवं. लोक म्हणतात की आम्हाला फरक पडत नाही... पण पिरियड्स होत असताना आम्ही काय करू?".
advertisement
5/7
शगुन पुढे म्हणाली,"तुम्ही का याबाबत बोलणं टाळता? तुम्हाला ते होत नाही म्हणून? जर तुम्ही समजून घेतलंत, तर एखाद्या मुलीचं आयुष्य थोडं सोपं होऊ शकतं. मग ती तुमची आई असो, बहीण असो किंवा गर्लफ्रेंड".
advertisement
6/7
शगुन शर्मा आणि अमन गांधी यांच्या अफेअरच्या बातम्या सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल झाल्या आहेत. नुकतंच शगुनने त्यांच्या नात्याला अधिकृत मान्यता दिली आहे.
advertisement
7/7
शगुन म्हणाली की ती 'तुलसीची मुलगी' बनण्या आधीपासूनच अमनला डेट करत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'हार्मोन्स वरखाली, 5-7 दिवस...', छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रीचा मासिक पाळीवर संताप, पुरुषांना चांगलंच सुनावलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल