TRENDING:

Upcoming Movies : 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर रिलीज होतायत हे 10 ब्लॉकबस्टर चित्रपट, वर्षाच्या शेवटी थिएटर गाजणार

Last Updated:
Upcoming Movies : 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या दोन महिन्यांमध्ये 10 ब्लॉकबस्टर बहुप्रतीक्षित चित्रपट रिलीज होणार आहेत. त्यामुळे वर्षाच्या शेवटी सिनेप्रेमींना एंटरटेनमेंटचा चांगलाच डोज मिळणार आहे.
advertisement
1/10
Upcoming Movies : 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर रिलीज होतायत हे 10 चित्रपट
द ताज स्टोरी (The Taj Story) : परेश रावल अभिनीत 'द ताज स्टोरी' हा कोर्टरूम ड्रामा बहुप्रतीक्षित चित्रपटांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. अमरीश गोयल दिग्दर्शित हा चित्रपट 31 ऑक्टोबर 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे.
advertisement
2/10
जटाधरा (Jatadhara) : 'जटाधरा' हा तेलुगू चित्रपट 7 नोव्हेंबर 2025 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे.
advertisement
3/10
तेरे इश्क में (Tere Ishk Mein) : आनंद एल राय यांचा 'तेरे इश्क में' हा रोमँटिक ड्रामा 28 नोव्हेंबर 2025 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.
advertisement
4/10
दे दे प्यार दे 2 (De De Pyaar De 2) : अजय देवगन आणि रकुलप्रीत सिंह यांचा आगामी 'दे दे प्यार दे' हा चित्रपट 14 नोव्हेंबर 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
advertisement
5/10
मस्ती 4 (Masti 4) : विवेक ओबेरॉय अभिनीत 'मस्ती 4' ही कॉमेडी फिल्म 21 नोव्हेंबर 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मिलाप जावेरी यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
advertisement
6/10
रोई रोई बिनाले (Roi Roi Binale) : दिवंगत जुबीन गर्ग यांचा शेवटचा प्रोजेक्ट अर्थात 'रोई रोई बिनाले' 31 ऑक्टोबर 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
advertisement
7/10
आर्यन (Aryan) : आर्यन हा एक तामिळ क्राइम ड्रामा आहे. प्रीन दिग्दर्शित हा चित्रपट 31 ऑक्टोबर 2025 रोजी रिलीज झाला आहे.
advertisement
8/10
लिक (Love Insurance Company) : 'लव्ह इन्शुरन्स कंपनी' हा तामिळ सायन्स फिक्शन रोमँटिक चित्रपट 18 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित होत आहे.
advertisement
9/10
आन पावम पोलाथाथु (Aan Paavam Pollathathu) : 'आन पावम पोलाथाथु' हा एक तामिळ कॉमेडी ड्रामा असणारा चित्रपट आहे. कलैयारासन थंगावेल दिग्दर्शित हा चित्रपट 31 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
advertisement
10/10
धुरंधर (Dhurandhar) : रणवीर सिंह, संजय दत्त आणि आर माधवन अशी तगडी स्टारकास्ट असणाऱ्या 'धुरंधर' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा आदित्य धर यांनी सांभाळली आहे. 5 डिसेंबर 2025 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Upcoming Movies : 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर रिलीज होतायत हे 10 ब्लॉकबस्टर चित्रपट, वर्षाच्या शेवटी थिएटर गाजणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल