TRENDING:

'एक सिरीअल हिट झाली की...', रिसेप्शनला नंदीवरून एन्ट्री करणाऱ्या प्राजक्ता गायकवडला नेटकऱ्यांनी धरलं धारेवर

Last Updated:
Prajakta Gaikwad Reception Entry: प्राजक्ता गायकवाडने आपल्या रिसेप्शन सोहळ्यात एक अतिभव्य आणि अनोखी एन्ट्री केली, ज्यामुळे तिची चर्चा झाली. पण त्याचमुळे ती आता नेटकऱ्यांच्या टीकेची धनी ठरली आहे.
advertisement
1/9
रिसेप्शनला नंदीवरून एन्ट्री करणाऱ्या प्राजक्ता गायकवडला नेटकऱ्यांनी धरलं धारेवर
पुणे: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिचा विवाहसोहळा आणि रिसेप्शन सध्या जोरदार चर्चेत आहे.
advertisement
2/9
व्यावसायिक शंभुराज खुटवड यांच्याशी विवाहबद्ध झालेल्या प्राजक्ताने आपल्या रिसेप्शन सोहळ्यात एक अतिभव्य आणि अनोखी एन्ट्री केली, ज्यामुळे तिची चर्चा झाली, पण त्याचमुळे ती आता नेटकऱ्यांच्या टीकेची धनी ठरली आहे.
advertisement
3/9
या जोडप्याने केलेल्या राजेशाही थाटाच्या एन्ट्रीवर काही चाहत्यांनी नाराजी व्यक्त करत, त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे.
advertisement
4/9
प्राजक्ता आणि शंभुराज यांनी आपल्या रिसेप्शनमध्ये केलेली ग्रँड एन्ट्री ही खूपच अविस्मरणीय होती. या जोडप्याने चक्क एका अवाढव्य नंदीवर बसून रिसेप्शनच्या ठिकाणी स्पेशल एन्ट्री घेतली होती. या वेळी फटाक्यांची आकर्षक आतिषबाजी करण्यात आली, ज्यामुळे सोहळ्याला एक वेगळी भव्यता मिळाली.
advertisement
5/9
रिसेप्शनसाठी प्राजक्ताने लाल रंगाची भरजरी साडी परिधान केली होती, तर शंभुराज यांनी मोती रंगाची शेरवानी घातली होती. प्राजक्ताच्या या अनोख्या एन्ट्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांना ही कृती अयोग्य वाटली.
advertisement
6/9
एका युजरने थेट कमेंट करत लिहिले, "हे फार चुकीच आहे. आपल्याच देवांची मस्करी आहे ही आणि असं स्वतःला श्रेष्ठ ठरवणं, काय बोलायचं!" नंदी हे हिंदू धर्मात पवित्र मानले जात असल्याने, त्यावर बसून एन्ट्री घेणे काही लोकांना धार्मिक भावना दुखावणे वाटले.
advertisement
7/9
दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, "हल्ली प्रत्येक गोष्टीचा शो-ऑफ करावा लागतो... लग्न हे स्वतःसाठी करतात की समाजासाठी.. हेच समजत नाही." तर आणखी एकाने, "एक मालिका हिट झाली की कलाकारांना एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो," असे म्हणत टोला लगावला आहे.
advertisement
8/9
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत एका आदर्श आणि पारंपरिक भूमिकेत दिसलेल्या प्राजक्ताने खऱ्या आयुष्यात अशी एन्ट्री केल्यामुळे तिच्या प्रतिमेबद्दलही चाहत्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
advertisement
9/9
या ग्रँड एन्ट्रीने सोशल मीडियावर भलेही धुमाकूळ घातला असेल, पण टीकेमुळे प्राजक्ताला आता यावर स्पष्टीकरण द्यावे लागण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'एक सिरीअल हिट झाली की...', रिसेप्शनला नंदीवरून एन्ट्री करणाऱ्या प्राजक्ता गायकवडला नेटकऱ्यांनी धरलं धारेवर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल