कोण होत्या व्ही.शांताराम यांच्या आयुष्यातील 'जयश्री'? ज्यांच्या भूमिकेत दिसणार तमन्ना भाटिया
- Published by:Minal Gurav
Last Updated:
चित्रपती व्ही.शांताराम यांच्यावर बायकोपिकची घोषणा करण्यात आली आहे. अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी प्रमुख भूमिका साकारणार आहे. या सिनेमात अभिनेत्री तमन्ना भाटियाचीही वर्णी लागली आहे. 'जयश्री' या व्यक्तिरेखेत तमन्ना दिसणार आहे.
advertisement
1/8

भारतीय सिनेमातील महान दिग्दर्शक आणि निर्माते शांताराम व्ही शांताराम यांच्या जीवनावर आधारित 'व्ही. शांताराम' या भव्य सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी सिनेमासाठी उत्सुकता दाखवली होती. अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी व्ही. शांताराम यांच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
advertisement
2/8
त्यानंतर आता सिनेमाचं दुसरं पोस्टर रिलीज झालं आहे. ज्यात 'जयश्री' या अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तिरेखेची पहिली झलक सादर करण्यात आली आहे. ही भूमिका अभिनेत्री तमन्ना भाटिया साकारणार आहेत. कोण होत्या व्ही. शांताराम यांच्या आयुष्यातील जयश्री ज्यांच्या भूमिका अभिनेता तमन्ना भाटिया साकारणार आहे.
advertisement
3/8
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये तमन्ना भाटिया गुलाबी साडीत मोहक अंदाजात दिसत आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वातील सोज्वळता, नजाकत आणि कलात्मकतेची नाजूकता पोस्टरमधून प्रकर्षाने जाणवते. या झलकितून चित्रपटाचा भव्य स्केल, वैभवशाली मांडणी आणि त्या काळाचा समृद्ध कॅन्व्हास स्पष्टपणे दिसून येतो.
advertisement
4/8
जयश्री या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. इतकंच नाही तर व्ही. शांताराम यांची सहकलाकार ते सहचारिणी असा नाजूक आणि भावस्पर्शी प्रवास या व्यक्तिरेखेतून उलगडणार आहे.
advertisement
5/8
चित्रपटात 'जयश्री' ही केवळ व्ही. शांताराम यांची पत्नी नसून, त्यांच्या आयुष्यातील पहिली प्रेरणा, कलात्मक सहप्रवासी आणि भावनिक आधारस्तंभ म्हणून साकारली जाणार आहे. सहकलाकार म्हणून सुरुवात होऊन विवाहापर्यंतचा प्रवास, प्रेम, तणाव, संवेदनशीलता आणि त्या काळातील सिनेमासृष्टीचे पडद्यामागचे वास्तव या चित्रपटातून उलगडले जाणार आहे.
advertisement
6/8
जयश्री आणि व्ही.शांताराम यांनी 1941 साली लग्न केलं. जयश्रीबरोबर व्ही. शांताराम यांचं दुसरं लग्न होतं. 1942 साली आलेल्या शांकुतला या सिनेमात काम केलं होतं. व्ही. शांताराम आणि जयश्री यांना तीन मुलं झाली. त्यांचा मुलगा म्हणजे प्रसिद्ध निर्माते किरण शांताराम, त्यांच्या दोन मुली राजश्री आणि तेजश्री. 1956 साली व्ही. शांताराम आणि जयश्री यांचा डिवोर्स झाला.
advertisement
7/8
सिद्धांत चतुर्वेदी यांच्या व्ही. शांताराम यांच्या पोस्टरने प्रेक्षकांमध्ये अपार उत्सुकता निर्माण केली होती. आता तमन्ना भाटियाच्या 'जयश्री'च्या पोस्टरमुळे त्या कथेतला भावनिक आणि कलात्मक थर अधिक गडद झाला आहे. पडद्यावर व्ही. शांताराम आणि जयश्री यांचे समीकरण, त्यांचा सहप्रवास आणि त्यांच्या नात्यातील गुंफण पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये अधिक वाढली आहे.
advertisement
8/8
'व्ही. शांताराम' हा चित्रपट येत्या नवीन वर्षात प्रदर्शित होणार आहे. तो भारतीय सिनेमाच्या सुवर्णकाळाला नव्या पिढीसमोर आणणारा एक भव्य आणि भावस्पर्शी सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कोण होत्या व्ही.शांताराम यांच्या आयुष्यातील 'जयश्री'? ज्यांच्या भूमिकेत दिसणार तमन्ना भाटिया