हृदयाशी संबंधित आजारांपासून वजन कमी करण्यापर्यंत; या फळाचे 6 चमत्कारिक फायदे
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
नाशपती हे असं एक फळ आहे, जे पोषक तत्वांचं पॉवरहाऊस आहे. आरोग्याचा खजिना त्यात दडलेला आहे. नाशपातीमध्ये अनेक पोषक घटक असतात. हृदयाशी संबंधित आजार, रक्तातील साखर, पोटाशी संबंधित आजार आणि वजन कमी करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. नाशपती आहारातील फायबरचा एक चांगला स्रोत आहे. त्यात अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि मिनरल्स देखील आढळतात.
advertisement
1/6

1. आहारातील फायबर- नाशपाती त्याच्या गुणधर्मांमुळे पोषक तत्वांचे पॉवरहाऊस आहे. याची अनेक कारणे आहेत. लोकांना पोटाशी संबंधित समस्या जास्त असतात, नाशपाती डायट्री फायबरमुळे ही समस्या दूर करू शकते. एका नाशपातीचे दररोज सेवन केल्याने 6 ग्रॅम फायबर मिळतं. ते बद्धकोष्ठतेसह अनेक आजारांपासून आराम देऊ शकतं
advertisement
2/6
व्हिटॅमिन- व्हिटॅमिन सी आणि अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट नाशपातीमध्ये आढळतात, जे भारताच्या तापमानानुसार खूप महत्वाचे आहेत. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि संसर्गापासून संरक्षण करते.
advertisement
3/6
मिनरल्स - नाशपातीमध्ये पोटॅशियम आढळतं, जे हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. सध्या भारतात हृदयरोगींची संख्या वाढत आहे, अशात दररोज एक नाशपाती खाल्लास ही समस्या कमी होऊ शकते.
advertisement
4/6
अँटिऑक्सिडंट्स - नाशपातीमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि कॅरोटीनॉइड्स नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात जे पेशींना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचवतात. प्रदूषणामुळे पेशींमध्ये भरपूर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण होतो ज्यामुळे अनेक आजार होतात.
advertisement
5/6
साखर कमी करतं - भारत जगाचं मधुमेह कॅपिटल बनत आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी नाशपाती हा उत्तम नाश्ता ठरू शकतो. विशेषतः सकाळी खाल्ल्यास साखर वाढणार नाही.
advertisement
6/6
हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे - 2019 च्या अभ्यासात असं आढळून आलं की नाशपाती हृदयाच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
हृदयाशी संबंधित आजारांपासून वजन कमी करण्यापर्यंत; या फळाचे 6 चमत्कारिक फायदे