TRENDING:

तुमचा रक्तदाब योग्य पातळीवर आहे का? महिला आणि पुरुषांच्या वयानुसार किती रक्तदाब असावा? लगेच समजून घ्या

Last Updated:
आजच्या काळात तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच या समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे रक्तदाब किती असावा, कोणत्या पातळीवर तो सामान्य मानला जातो आणि वय व लिंगानुसार त्यात कसा बदल होतो, हे जाणून घेणं आवश्यक आहे.
advertisement
1/7
महिला आणि पुरुषांच्या वयानुसार किती रक्तदाब असावा? लगेच समजून घ्या
सामान्यतः आपल्या शरीरातील रक्त योग्यप्रकारे वाहत राहण्यासाठी रक्तदाब संतुलित असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेकदा जीवनशैली, ताणतणाव, चुकीचे आहार किंवा अनियमित दिनचर्या यामुळे रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे दिसून येते. आजच्या काळात तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच या समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे रक्तदाब किती असावा, कोणत्या पातळीवर तो सामान्य मानला जातो आणि वय व लिंगानुसार त्यात कसा बदल होतो, हे जाणून घेणं आवश्यक आहे.
advertisement
2/7
रक्तदाब (BP) म्हणजे हृदय एका ताणानं रक्तवाहिन्यांमध्ये किती दबावाने रक्त ढकलते. त्याचे दोन माप असतात: वरचा (सिस्टोलिक) आणि खालचा (डायस्टोलिक). ज्याला आपण हाय बीपी आणि लो बीपी म्हणून ओळखतो. दोन्ही जास्त असेल तर समस्या आहे. मग आता हे बीपी किती असावं? चला समजून घेऊ.
advertisement
3/7
सामान्य रक्तदाब किती?सर गंगाराम हॉस्पिटल, नवी दिल्ली यांच्या प्रतिबंधात्मक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. सोनिया रावत यांच्या मते, प्रौढ व्यक्तींचा हाय बीपी120 मिमी एचजी आणि लो बीपी (खालचा दाब) 80 मिमी एचजी किंवा त्याहून कमी असावा
advertisement
4/7
120/80 मिमी एचजी - सामान्य रक्तदाब130/80 मिमी एचजी - सीमारेषेवरचा (थोडा जास्त) रक्तदाब140/90 मिमी एचजीपेक्षा जास्त - उच्च रक्तदाब
advertisement
5/7
पुरुषांचा वयानुसार सामान्य रक्तदाब21 ते 30 वर्षे : हाय बीपी 119 मिमी एचजी, लो बीपी 70 मिमी एचजी31 ते 40 वर्षे : हाय बीपी 120 मिमी एचजी, लो बीपी 70 मिमी एचजी41 ते 50 वर्षे : हाय बीपी 124 मिमी एचजीपर्यंत, लो बीपी 77 मिमी एचजीपर्यंत51 ते 60 वर्षे : हाय बीपी 125 मिमी एचजी, लो बीपी 77 मिमी एचजी60 ते 65 वर्षे : हाय बीपी 133 मिमी एचजी, लो बीपी 69 मिमी एचजीपर्यंत सामान्य आहे
advertisement
6/7
महिलांचा रक्तदाब पुरुषांपेक्षा किंचित कमी असतो.21 ते 30 वर्षे : हाय बीपी 110 मिमी एचजी, लो बीपी 68 मिमी एचजी31 ते 40 वर्षे : हाय बीपी 110 मिमी एचजी, लो बीपी 70 मिमी एचजी41 ते 50 वर्षे : हाय बीपी 122 मिमी एचजीपर्यंत, लो बीपी 74 मिमी एचजीपर्यंत51 ते 60 वर्षे : हाय बीपी 122 मिमी एचजी, लो बीपी 74 मिमी एचजी61 ते 65 वर्षे : हाय बीपी 133 मिमी एचजी, लो बीपी 69 मिमी एचजीपर्यंत सामान्य आहे
advertisement
7/7
वयानुसार आणि लिंगानुसार रक्तदाबात थोडेफार बदल होणे सामान्य आहे. मात्र, रक्तदाब सतत जास्त किंवा कमी राहिल्यास आरोग्याच्या दृष्टीने ते धोकादायक ठरू शकते. त्यामुळे वेळोवेळी बीपी तपासणे आणि निरोगी जीवनशैली ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
तुमचा रक्तदाब योग्य पातळीवर आहे का? महिला आणि पुरुषांच्या वयानुसार किती रक्तदाब असावा? लगेच समजून घ्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल