TRENDING:

Coffee Face Mask: काळवंडलेल्या चेहऱ्यावर वापरा जादू करणारा कॉफी फेस मास्क, सगळेच विचारतील चेहऱ्याला काय लावलं...

Last Updated:
अनेकांच्या दिवसाची सुरुवात कॉफीनं होते. सकाळची मरगळ दूर करणं असो किंवा त्वचेचा तजेला कायम ठेवणं असो, कॉफी नेहमीच प्रभावी ठरते. ही कॉफी त्वचेसाठी एक उत्तम उपाय का ठरु शकते पाहूया.
advertisement
1/8
काळवंडलेल्या चेहऱ्यावर वापरा कॉफी फेस मास्क, सगळेच विचारतील चेहऱ्याला काय लावलं
अनेकांच्या दिवसाची सुरुवात कॉफीनं होते. सकाळची मरगळ दूर करणं असो किंवा त्वचेचा तजेला कायम ठेवणं असो, कॉफी नेहमीच प्रभावी ठरते. ही कॉफी त्वचेसाठी एक उत्तम उपाय का ठरु शकते पाहूया.
advertisement
2/8
कॉफीमधील अँटीऑक्सिडंट्स आणि कॅफिन त्वचेला डिटॉक्सिफाय करण्यासाठी, रक्ताभिसरण वाढवण्यासाठी आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करतात. चमकदार त्वचेसाठी पाच प्रभावी कॉफी फेस मास्क पाहूया.
advertisement
3/8
मध आणि कॉफी मास्क - या मास्कमुळे त्वचा एक्सफोलिएट आणि हायड्रेट होते. मास्क बनवण्यासाठी अर्धा चमचा मध एक चमचा कॉफी पावडरमधे मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर पंधरा-वीस मिनिटं राहू द्या आणि नंतर थंड पाण्यानं धुवा. साखर त्वचेला नैसर्गिकरित्या मॉइश्चरायझ करेल, तर कॉफी मृत त्वचेच्या पेशी काढून टाकेल आणि नवीन पेशींच्या वाढीस प्रोत्साहन देईल.
advertisement
4/8
दही आणि कॉफी पॅक - दह्यात लॅक्टिक एसिड असतं, डाग कमी करण्यासाठी हा पॅक उपयुक्त आहे. एक चमचा कॉफी पावडर दोन चमचे ताज्या दह्यात मिसळून पेस्ट बनवा. चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि सुकल्यानंतर हलक्या हातानं मसाज करा. हा पॅक तुमची त्वचा स्वच्छ करतो.
advertisement
5/8
नारळ तेल आणि कॉफी स्क्रब - नारळ तेल नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करतं. एक चमचा कॉफी आणि अर्धा चमचा नारळ तेल मिसळा आणि हे मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर हलक्या हातानं मसाज करा. दहा मिनिटांनी धुवा. या स्क्रबमुळे त्वचेतील रक्ताभिसरण वाढतं आणि कोरडेपणा कमी होतो.
advertisement
6/8
कोरफड आणि कॉफी जेल मास्क - कोरफडीमुळे त्वचा शांत होते. कॉफी पावडर ताज्या कोरफड जेलमधे मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. ती तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि पंधरा मिनिटांनी धुवा. हा मास्क उन्हाची जळजळ, लालसरपणा आणि जळजळ कमी करण्यास मदत करतो.
advertisement
7/8
दूध आणि कॉफी फेस पॅक - दुधात लॅक्टिक एसिड असतं, यामुळे त्वचा मऊ होते. एक चमचा कॉफी पावडर भरपूर प्रमाणात दुधात मिसळून पेस्ट तयार करा. ते तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि सुकू द्या. सुकल्यावर हलक्या हातानं घासून काढा. हा पॅक तुमच्या त्वचेची नैसर्गिक चमक वाढवण्यास मदत करतो.
advertisement
8/8
नोट : वरील माहिती ही समान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Coffee Face Mask: काळवंडलेल्या चेहऱ्यावर वापरा जादू करणारा कॉफी फेस मास्क, सगळेच विचारतील चेहऱ्याला काय लावलं...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल