पुण्यात खा इटालियन डेझर्ट, पॅना कोटाचे मिळतायत तब्बल 20 प्रकार, ठिकाण माहितीये का?
- Published by:Mohan Najan
Last Updated:
या ठिकाणी तुम्हाला इटालियन डेझर्ट पॅना कोटाचे तब्बल 20 प्रकार चाखायला मिळतात. सायली मांजरेकर यांनी हा कॅफे सुरू केलेला आहे.
advertisement
1/7

पुणे शहरात नवनवीन पदार्थ खायला नेहमीच मिळत असतात. पारंपरिक पदार्थांसोबतच आता आंतरराष्ट्रीय पदार्थांची भुरळ पुणेकरांना पडत आहे. हे पदार्थ खाण्यासाठी मोठी गर्दी पहायला मिळते.
advertisement
2/7
जेएम रोड परिसरातील वॉबल्स कॅफे आहे. या ठिकाणी तुम्हाला इटालियन डेझर्ट पॅना कोटाचे तब्बल 20 प्रकार चाखायला मिळतात. सायली मांजरेकर यांनी हा कॅफे सुरू केलेला आहे.
advertisement
3/7
सायली यांनी वयाच्या साठीमध्ये व्यवसायाची सुरुवात केली. त्यांनी 2019 साली ऑस्ट्रेलियन मास्टरशेफ हा लोकप्रिय शो पाहिला. या कार्यक्रमातूनच त्यांना पॅना कोटा या इटालियन डेझर्टची ओळख झाली.
advertisement
4/7
त्यामुळे त्यांनी हा पदार्थ घरीच बनवण्याचा निर्णय घेतला. चार ते पाच वेळा प्रयत्न केल्यानंतर त्यांना अपेक्षित चव आणि टेक्स्चर साध्य झाले. घरच्यांनीही त्यांच्या या प्रयोगाला पूर्ण पाठिंबा दिला. या व्यवसायाची सुरुवात करताना त्यांनी सुरुवातीला सोसायटीमध्ये पॅना कोटाचा छोटासा स्टॉल लावला. या स्टॉलला रहिवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
advertisement
5/7
त्यानंतर औंधमधील एका गार्डनमध्ये स्टॉल लावून त्यांनी व्यवसायाचा विस्तार केला. ग्राहकांची वाढती मागणी पाहता आणि कोरोना काळानंतर परिस्थिती सुधारताच त्यांनी जेएम रोड परिसरात वॉबल्स कॅफे सुरू केले.
advertisement
6/7
व्यवसाय सुरू करावा ही माझ्या नवऱ्याची खूप दिवसांची इच्छा होती. मात्र कोणता व्यवसाय करायचा हे ठरत नव्हते. मास्टरशेफ पाहिल्यानंतर पॅना कोटा करण्याची कल्पना सुचली आणि त्यातूनच हा प्रवास सुरू झाला. त्यांच्या या निर्णयामागे पतीची इच्छा पूर्ण करण्याची भावना होती, तसेच स्वतःच्या आवडीचे काहीतरी करण्याचा आत्मविश्वासही होता, असं सायली सांगतात.
advertisement
7/7
त्यांच्या या कॅफेमध्ये पॅना कोटाचे 20 वेगवेगळे फ्लेवर्स उपलब्ध आहेत. यामध्ये स्ट्रॉबेरी, मॅंगो, कॅरेमल, रसमलाई, चॉकलेट यांसारख्या विविध चवी ग्राहकांना आकर्षित करतात. या पदार्थांची किंमत 99 रुपयांपासून सुरू होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
पुण्यात खा इटालियन डेझर्ट, पॅना कोटाचे मिळतायत तब्बल 20 प्रकार, ठिकाण माहितीये का?