Hair Transplant Risks : हेअर ट्रांसप्लांट करताय? सावधान.. जीवावर बेतू शकते प्रक्रिया, हे दुष्परिणाम माहित हवेच
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Hair Transplant Side Effects : ज्याप्रमाणे मुली सुंदर दिसण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स घेतात. त्याचप्रमाणे हल्ली मुलांमध्ये हेअर ट्रान्सप्लांट म्हणजेच केस प्रत्यारोपणाचे क्रेझ वाढले आहे. ही शस्त्रक्रिया सौंदर्य वाढवण्यासाठी एक प्रभावी मार्ग म्हणून खूप लोकप्रिय झाली आहे. मात्र अनेक लोक त्वरीत आणि स्वस्त उपचारांच्या आमिषाने अनुभव नसलेल्या बोगस डॉक्टरांकडे किंवा अनधिकृत केंद्रांवर हेअर ट्रान्सप्लांट करून घेतात. अशा वेळी उपचाराचे फायदे होण्याऐवजी गंभीर आणि आयुष्यभरासाठीचे दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. चला तर मग पाहूया याचे दुष्परिणाम.
advertisement
1/7

हेअर ट्रान्सप्लांट ट्रीटमेंटमुळे झालेल्या गंभीर समस्येची काही उदाहरणं आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत. एका पोलीस निरीक्षकाने एका अनधिकृत केंद्रातून हेअर ट्रान्सप्लांट करून घेतले. या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या चेहऱ्याला पॅरालिसिस झाला आणि त्यांना बोलण्यात अडचण येऊ लागली.
advertisement
2/7
हे अत्यंत धोकादायक आहे. कारण चुकीच्या पद्धतीने केस प्रत्यारोपण केल्यास चेहऱ्याच्या नसांना इजा होऊ शकते, ज्यामुळे कायमस्वरूपी अर्धांगवायू होण्याचा धोका निर्माण होतो. हे स्पष्टपणे दर्शवते की हेअर ट्रान्सप्लांटची प्रक्रिया किती संवेदनशील असते आणि ती केवळ प्रशिक्षित डॉक्टरांकडूनच केली जाणे आवश्यक आहे.
advertisement
3/7
हेअर ट्रान्सप्लांटचा मूळ उद्देश डोक्यावर पुन्हा केस वाढवणे हा असतो. मात्र, काही प्रकरणांमध्ये या उपचाराचा मूळ उद्देशच सफल होत नाही. एका युवकाने दोन वर्षांपूर्वी फ्रंट लाइन हेअर ट्रान्सप्लांट करून घेतले होते आणि त्यासाठी त्याने मोठी रक्कमही मोजली होती. सेंटरच्या संचालकांनी त्याला केस वाढतील असे आश्वासन दिले होते, परंतु शस्त्रक्रियेनंतर त्याच्या केसांची वाढ पूर्णपणे थांबली. यामुळे त्याचा पैसा वाया गेलाच. सोबत केस परत मिळवण्याची आशाही फोल संपली.
advertisement
4/7
अयोग्य आणि निकृष्ट हेअर ट्रान्सप्लांटमुळे डोक्याच्या त्वचेवर गंभीर संसर्ग होण्याचा धोका वाढतो. संदीप नावाच्या एका व्यक्तीने हेअर ट्रान्सप्लांट करून घेतल्यानंतर त्याला सुरुवातीला डोकेदुखी आणि खाज सुरू झाली. काही दिवसांतच ही समस्या वाढली आणि त्याच्या डोक्यात संसर्ग, पुरळ आणि पस भरला. या असह्य वेदनांमुळे त्याला रात्रंदिवस डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागला. अशा गंभीर संसर्गावर वेळीच उपचार न केल्यास त्वचेचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते.
advertisement
5/7
जेव्हा एखादी व्यक्ती चुकीच्या ठिकाणी हेअर ट्रान्सप्लांट करून घेते, तेव्हा तिला केवळ तात्पुरता त्रास होत नाही, तर त्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी तिला लांब आणि महागडे उपचार घ्यावे लागतात. संसर्ग बरा करण्यासाठी अँटिबायोटिक्स, जखमा भरून काढण्यासाठी विशेष मलमे आणि खराब झालेले केस पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी दुरुस्ती शस्त्रक्रिया करावी लागते. हे सर्व रुग्णाला मोठा आर्थिक फटका आणि मानसिक ताण देतात. तसेच उपचाराचा काळही वाढतो.
advertisement
6/7
या सर्व घटना दर्शवतात की, हेअर ट्रान्सप्लांटसारख्या शस्त्रक्रियेसाठी केवळ योग्य शिक्षण आणि अनुभव असलेले डॉक्टर, त्याचप्रमाणे अधिकृत केंद्र निवडणे अत्यंत आवश्यक आहे. उपचारांपूर्वी सेंटरची तपासणी करणे, डॉक्टरांची पात्रता तपासणे आणि वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती घेणे आवश्यक आहे. केवळ स्वस्त दरामुळे किंवा आकर्षक जाहिरातींमुळे स्वतःचा जीव धोक्यात घालू नका. कारण त्याचे परिणाम आरोग्यासाठी गंभीर असू शकतात.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Hair Transplant Risks : हेअर ट्रांसप्लांट करताय? सावधान.. जीवावर बेतू शकते प्रक्रिया, हे दुष्परिणाम माहित हवेच