TRENDING:

Rat Home Remedies : लसूण ठरेल ब्रह्मास्त्र; ना खर्च, ना त्रास उंदीर करतील घराला टाटा बाय-बाय, फक्त 'ही' गोष्ट करा

Last Updated:
उंदरांना जितकं घराबाहेर ठेवता येईल तितकं चांगलं आणि अनेकांचा हाच प्रयत्न असतो. पण किती केलं तरी देखील हे जीव एकदा घरात घुसले की सहजासहजी जात नाही.
advertisement
1/9
ना खर्च, ना त्रास, उंदीर करतील घराला टाटा बाय-बाय; फक्त 'ही' गोष्ट करा
पावसाळा सुरू झाला की हवेत गारवा, ओलसरपणा आणि थोडंसे दमट वातावरण निर्माण होतं. पण अशा वेळी घरात नकोशा पाहुण्यांची म्हणजे पाल आणि उंदीरांची एन्ट्री होते. हे दोन्ही जीव दिसायला भितीदायक तर असतातच, पण त्याहून वाईट म्हणजे घराची स्वच्छता आणि अन्नधान्याचं नुकसान करतात. त्यामुळे त्यांना जितकं घराबाहेर ठेवता येईल तितकं चांगलं आणि अनेकांचा हाच प्रयत्न असतो. पण किती केलं तरी देखील हे जीव एकदा घरात घुसले की सहजासहजी जात नाही.
advertisement
2/9
अशावेळी बाजारात मिळणारे केमिकल स्प्रे काही काळासाठी परिणामकारक वाटतात, पण त्यांच्या तीव्र वासामुळे आणि रासायनिक घटकांमुळे लहान मुलं आणि पाळीव प्राण्यांसाठी ते धोकादायक ठरू शकतात. मग उपाय काय? तर आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचा वेळ, पैसा तर वाचेलत शिवाय हा पदार्थ केमिकलयुक्त नसेल, ज्यामुळे शरीरावर देखील वाईट परिणाम होणार नाही.
advertisement
3/9
यासाठी लसणचा घरगुती उपाय, जो सुरक्षित, सोपा आणि परिणामकारक आहे. चला तर मग जाणून घेऊया, लसूण वापरून घरातून पाल आणि उंदीर कसे पळवता येतात.
advertisement
4/9
1 लसणाच्या पाकळ्या ठेवाघरात साप किंवा उंदीर दिसणाऱ्या ठिकाणी जसं की दरवाजाजवळ, खिडकीजवळ किंवा कोपऱ्यांमध्ये सोललेल्या लसणाच्या काही पाकळ्या ठेवा. हवंतर त्याला धाग्याने ओवून लटकवू शकता. लसूणाचा तीव्र वास या दोन्ही जीवांना सहन होत नाही आणि ते घरातून निघून जातात.
advertisement
5/9
2. लसूणाचं स्प्रे बनवाजलद परिणाम हवा असेल तर हा उपाय उत्तम, काही लसूण पाकळ्या किसून किंवा वाटून त्यात पाणी मिसळा आणि हे मिश्रण स्प्रे बाटलीत भरा. मग तो भिंतींवर, कोपऱ्यांमध्ये, कपाटाजवळ किंवा जिथे हे प्राणी लपतात तिथे शिंपडा. लसूणाच्या गंधाने ते स्वतःहून दूर निघून जातात.
advertisement
6/9
3. लसूण आणि मीठाचं मिश्रणदोन लसूण पाकळ्या किसून त्यात थोडं मीठ मिसळा. हे मिश्रण छोट्या वाटीत भरून उंदीर वा पाल येणाऱ्या ठिकाणी ठेवा. याचा वास दीर्घकाळ टिकतो आणि त्या भागात हे जीव परत येत नाहीत.
advertisement
7/9
4. लसूण आणि कांद्याची पोटलीपाल आणि उंदीर दोघांनाही कांदा आणि लसूणाचा वास सहन होत नाही. त्यामुळे दोन्ही बारीक चिरून एक कपड्यात बांधा आणि घराच्या त्या कोपऱ्यांवर ठेवा जिथे हे वारंवार दिसतात. हा उपाय पूर्णपणे नैसर्गिक आणि अतिशय प्रभावी आहे.
advertisement
8/9
काही गोष्टी लक्षात ठेवालसणाचे मिश्रण लहान मुलं आणि पाळीव प्राण्यांच्या आवाक्याबाहेर ठेवा.घर नेहमी कोरडं आणि स्वच्छ ठेवा, कारण ओलसर आणि अंधाऱ्या जागी हे जीव जास्त वाढतात.घरात पुरेसं प्रकाश आणि वायुविजन (Ventilation) असेल तर छिपकली आणि उंदीर टिकूच शकत नाहीत.
advertisement
9/9
पाल आणि उंदीर पळवण्यासाठी आता केमिकल स्प्रेची गरज नाही. लसूणासारखा नैसर्गिक उपाय वापरून तुम्ही घर सुरक्षित, स्वच्छ आणि सुगंधी ठेवू शकता. थोडं नियमित लक्ष दिलं आणि घर कोरडं ठेवलं, की हे नकोसे पाहुणे कायमचे पळून जातात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Rat Home Remedies : लसूण ठरेल ब्रह्मास्त्र; ना खर्च, ना त्रास उंदीर करतील घराला टाटा बाय-बाय, फक्त 'ही' गोष्ट करा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल