TRENDING:

Travel Tips : प्रवास संपल्यानंतर बस तिकीट किती महत्त्वाचं? प्रवाशांचं मोठं नुकसान होता होता वाचलं..

Last Updated:
Importance of bus ticket : आपण सर्वांनीच कधी ना कधी बसमध्ये प्रवास केला असेल आणि बरीच लोक नियमित बसनेच प्रवास करतात. बसमध्ये प्रवास करताना जे तिकीट सपान काढतो, ते तिकीट साधारण सर्वच लोक प्रवास संपल्यानंतर फेकून देतात. कारण एकदा प्रवास संपला की त्याचा काही उपयोग नाही असे सर्वांना वाटते. मात्र हे तिकीट तुमच्यासाठी खूप फायद्याचे ठरू शकते. चला पाहूया कसे.
advertisement
1/5
प्रवास संपल्यानंतर बस तिकीट किती महत्त्वाचं? प्रवाशांचं मोठं नुकसान वाचलं..
बसचा प्रवास संपल्यावर तिकीट फेकणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र रेडिट या वेबसाईटवर एका व्यक्तीने आपला अनुभव शेअर केला आहे. तिकीट फेकणं त्याला किती महाग पडू शकलं असतं याबद्दल त्याने सांगितले आहे.
advertisement
2/5
या पोस्टमध्ये व्यक्तीने सांगितले की, 'मी जर आज बसचा प्रवास झाल्यानंतर तिकीट फेकले असते तर माझे खूप नुकसान झाले असते. मात्र मी तिकीट फेकले नाही आणि एका संकट काळात मला त्याला फायदा झाला. मोठे नुकसान होण्यापासून वाचवले.'
advertisement
3/5
पोस्ट शेअर करणाऱ्या व्यक्तीच्या काही वस्तू बसमध्ये विसरल्या होत्या. त्याने डेपोला कॉल करण्याचा प्रयत्न केला पण ते पोहोचू शकले नाहीत. तिकिटावरील हेल्पलाइन नंबरने त्यांना मदत केली. या नंबरवर कॉल करून त्याला पुढच्या तासाभरात कंडक्टरशी संपर्क साधता आला आणि त्यांचे सामान परत मिळवता आले.
advertisement
4/5
ही पोस्ट वाचल्यानंतर, इतरही बऱ्याच वापरकर्त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. एका वापरकर्त्याने 15 वर्षांपूर्वी अशाच प्रकारे त्यांची लॅपटॉप बॅग बसमध्ये सोडली होती. पुढच्या काही तासांत ती सहजपणे परत मिळवणे शक्य झाले हेही सांगितले.
advertisement
5/5
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Travel Tips : प्रवास संपल्यानंतर बस तिकीट किती महत्त्वाचं? प्रवाशांचं मोठं नुकसान होता होता वाचलं..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल