TRENDING:

India Snow Spots : शिमला-मनालीच नाही बर्फासाठी 'हे' ठिकाणही आहे प्रसिद्ध! भारतातील स्वित्झर्लंडच जणू..

Last Updated:
Winter travel destinations in india : हिवाळ्यात बर्फ पाहण्यासाठी बरेच लोक शिमला, मनाली, काश्मीरला जातात. मात्र त्यापेक्षाही आणखी एक अगदी सुंदरता ठिकाण आहे आणि भारतातील हे ठिकाण स्वित्झर्लंडपेक्षाही खूप छान आहे. दरवर्षी अनेक पर्यटक इथे येतात. चला पाहूया भारतातील या बर्फाळ ठिकाणाबद्दल माहिती.
advertisement
1/5
शिमला-मनालीच नाही बर्फासाठी हे ठिकाणही आहे प्रसिद्ध! भारतातील स्वित्झर्लंडच जणू
भारतातील या ठिकाणाला स्वित्झर्लंड आणि नॉर्वेइतकेच सौंदर्य लाभले आहे. हिवाळ्यात इथे स्वर्गापेक्षाही सुंदर दृश्ये दिसतात. डिसेंबर आणि जानेवारीच्या थंडीत इथे प्रवास करण्याचे स्वतःचे एक वेगळे आकर्षण आहे.
advertisement
2/5
हे ठिकाण आहे, हिमाचल प्रदेशातील नारकंडा. इथे तुम्हाला बर्फाच्छादित साहसी उपक्रम म्हणजेच बऱ्याच बर्फातील ऍक्टिव्हिटीज करायला मिळतात. तसेच इथे पाहण्यासारखी अनेक सुंदर ठिकाणं आणि नैसर्गिक दृश्ये आहेत.
advertisement
3/5
शिमलामध्ये वाढत्या गर्दीमुळे, पर्यटक अप्पर शिमला येथे देखील येत आहेत. शिमलापासून 70 किमी अंतरावर असलेल्या नारकंडा येथे आजकाल आल्हाददायक हवामान अनुभवले जात आहे. येथील दिवसाचे तापमान सुमारे 23 अंश सेल्सिअस आणि रात्रीचे तापमान सुमारे 14 अंश सेल्सिअस असते.
advertisement
4/5
नारकंडा येथे, पर्यटक हातू शिखर आणि तानी जुब्बार तलाव पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. आजूबाजूच्या जंगलात कॅम्पिंगचा आनंद घेतात. आठवड्याच्या शेवटी म्हणजेच वीकेंड्सला नारकंडा येथील हॉटेल्स गजबजलेली असतात.
advertisement
5/5
शिमला येथील नारकंडा परिसर हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे, जिथे हिवाळ्यात जोरदार बर्फवृष्टी होते. हातू शिखरावरील हातू माता मंदिर मोठ्या संख्येने पर्यटक आणि भाविकांना आकर्षित करते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
India Snow Spots : शिमला-मनालीच नाही बर्फासाठी 'हे' ठिकाणही आहे प्रसिद्ध! भारतातील स्वित्झर्लंडच जणू..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल