TRENDING:

Home Decor : घरात 'हे' बदल करा, छोट्या फ्लॅटला मिळेल लॅव्हिश लूक! घर दिसेल भव्य आणि आकर्षक

Last Updated:
home interior in budget : घर हा प्रत्येकासाठी खूपच जिव्हाळ्याचा विषय आहे. पण नुसतं घर घेणं पुरेसं नसतं. ते घर सजावणंही तितकंच महत्त्वाचं असतं. बरेच लोक काही कारणास्तव लहान घर घेतात किंवा त्यांना घ्यावं लागतं. मात्र या छोट्या घरालाही तुम्ही भव्य आणि सुंदर बनाव शकता. तेही काही सोप्या सोप्या टिप्स वापरून. चला पाहूया ते कसे..
advertisement
1/7
घरात 'हे' बदल करा, छोट्या फ्लॅटला मिळेल लॅव्हिश लूक! घर दिसेल भव्य-आकर्षक
घर घेतल्यानंतर आपण घरामध्ये इंटेरियर तर करतोच मात्र काहीवेळा त्यामुळे आपले घर खुप लहान दिसू लागते. त्यामुळे घर सजवताना काही गोष्टींची काळजी घेणं खूप आवश्यक असतं. घरातील काही वस्तू योग्य पद्धतीने निवडल्यास तुमचे घर आकर्षक आणि मोठे दिसू शकते.
advertisement
2/7
मोठे आरसे : लहान घरात मोठे आरसे लावल्यास ते क्लासिक आणि प्रभावी दिसतात. एखाद्या रिकाम्या भिंतीवर तुम्ही मोठा, उंच आरसा लावू शकता. तो खिडकीसमोर ठेवल्यास जास्त चांगले. कारण आरसे प्रकाश परावर्तित करतात, ज्यामुळे खोली मोठी दिसते आणि घरात प्रकाशी खूप येतो. तुम्ही तुम्हाला हवे त्या पद्धतीचे आरसे निवडू शकता. हल्ली बाजारात खूप सुंदर आरसे उपलब्ध आहेत, जे घराला आलिशान लूक देऊ शकतात.
advertisement
3/7
भिंती आणि फर्निचर : भिंती आणि फर्निचरचा रंग चमकदार असावा, जेणेकरून भिंती मोठ्या दिसू शकतात. पांढरा, क्रीम, पेस्टल किंवा हलका राखाडी रंग वापरा. ​​हे रंग लहान जागेसाठी बेस्ट आहेत. त्यांच्याभोवती सोफा आणि डायनिंग टेबलसारखे मुख्य फर्निचर ठेवा. असे हलके रंग घर अधिक प्रशस्त आणि मोठे असल्याचे भासवतात.
advertisement
4/7
मल्टीफंक्शनल फर्निचर : हा सर्वात महत्वचाह मुद्दा आहे. आपण घरामध्ये फर्निचर निवडताना ते केवळ आपल्याला एखादी गोष्ट आवडली आहे म्हणून तीच घ्यायची असे करू नये, त्या उलट घरात जागा आणि गरज यानुसार ते निवडावे. घरात मल्टीफंक्शनल फर्निचर वापरल्याने घराचे स्वरूप देखील वाढू शकते.
advertisement
5/7
सोफा-कम-बेड, स्टोरेज कॅबिनेट, कॉफी टेबल आणि फोल्डिंग डायनिंग टेबल्सचा विचार करा. हे जागा वाचवतात आणि गर्दी कमी करतात. रूम जितकी जास्त गजबजलेली असेल तितकी ती अधिक लहान दिसते आणि जितकी अधिक व्यवस्थित असेल तितकी अधिक आलिशान दिसते.
advertisement
6/7
शेल्फ्स आणि स्टोरेज : खोली मोठी दिसण्यासाठी उभ्या जागेचा वापर करा. भिंतींवर ओपन शेल्फ किंवा उंच बुकशेल्फ बसवा. खिडकीवर पडदे लावण्याऐवजी ते वरती अगदी छताजवळ लावा. यामुळे रूम उंच दिसण्यास मदत होईल, तसेच ती मोठी आणि अधिक व्यवस्थित दिसेल.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Home Decor : घरात 'हे' बदल करा, छोट्या फ्लॅटला मिळेल लॅव्हिश लूक! घर दिसेल भव्य आणि आकर्षक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल