Tea : एक महिना दूधाची चहा पिणं बंद केलं तर शरीरात काय बदल होतील? तज्ज्ञांचा धक्कादायक खुलासा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
काहींची चहाशिवाय झोपच उडत नाही, तर काहींना तो ऑफिसमधील थकवा दूर करणारा साथीदार वाटतो. सकाळ, दुपार किंवा संध्याकाळ चहा हा आपल्या दिनचर्येचा अविभाज्य भाग झाला आहे. पण आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं, तर रोज दूधाची चहा पिणं शरीरावर काही नकोसे परिणाम घडवू शकतं, हे तज्ज्ञ सांगतात.
advertisement
1/10

बहुतांश भारतीयांची सकाळी न चुकता केली जाणारी गोष्ट म्हणजे चहा. अनेकांच्या दिवसाची सुरुवातच "एक कप चहा" शिवाय होत नाही. जर एखाद्या कारणामुळे सकाळी चहा पिता आली नाही तर मात्र दिवस फारच खराब जातो असं अनेकांचं म्हणणं आहे. काहींची चहाशिवाय झोपच उडत नाही, तर काहींना तो ऑफिसमधील थकवा दूर करणारा साथीदार वाटतो. सकाळ, दुपार किंवा संध्याकाळ चहा हा आपल्या दिनचर्येचा अविभाज्य भाग झाला आहे. पण आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं, तर रोज दूधाची चहा पिणं शरीरावर काही नकोसे परिणाम घडवू शकतं, हे तज्ज्ञ सांगतात.
advertisement
2/10
जर तुम्ही दिवसातून 3-4 वेळा चहा पिता सकाळी उठल्यावर, कामाच्या ब्रेकमध्ये आणि संध्याकाळी नाश्त्यासोबत तर कल्पना करा, जर तुम्ही एक महिनाभर दूधाची चहा पिणं थांबवलं तर तुमच्या शरीरात काय बदल दिसतील?
advertisement
3/10
दूध आणि चहाचं विचित्र कॉम्बिनेशनदुधात प्रथिने, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सारखे घटक असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. त्याचप्रमाणे साधी काळी चहाही शरीराला काही प्रमाणात लाभदायक असते. पण जेव्हा हे दोन्ही एकत्र केले जातात म्हणजेच दुधात चहाची पत्ती आणि साखर मिसळली जाते तेव्हा त्या मिश्रणातील टॅनिन आणि कॅफीन हे घटक एकत्र येऊन शरीरासाठी त्रासदायक ठरू शकतात.
advertisement
4/10
कॅफीनमुळे शरीरावर होणारा परिणाम‘National Center for Biotechnology Information’ च्या माहितीनुसार, कॅफीन हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे स्टिम्युलंट सब्स्टन्स आहे. हे काही काळ ताजेतवानेपणा देतं, पण त्याचबरोबर याचा अतिरेक केल्यास भीती, चिंता, पोटाच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात.
advertisement
5/10
पण मग आता प्रश्न असा उभा रहातो की चहा पिणं थांबवलं तर काय होईल?जर तुम्ही अचानक चहा पिणं थांबवलं, तर सुरुवातीला डोकेदुखी, थकवा, चिडचिड, एंग्झायटी अशा लक्षणांचा अनुभव येऊ शकतो. ही लक्षणं काही दिवस टिकतात, पण नंतर शरीर हळूहळू या सवयीशिवाय राहायला शिकतं आणि सकारात्मक बदल दिसू लागतात.
advertisement
6/10
आयुर्वेद तज्ज्ञ किरण गुप्ता सांगतात की, चहात असलेली कॅफीन झोपेचा नैसर्गिक पॅटर्न बिघडवते. पण जर तुम्ही एक महिना चहा पिणं बंद केलं, तर झोप अधिक खोल आणि ताजेतवानी करणारी होते. शरीरातील थकवा कमी होतो आणि दिवसभर ऊर्जा टिकते.
advertisement
7/10
अति चहा पिल्याने शरीरातील पोषक तत्त्वांचं शोषण कमी होतं आणि त्यामुळे कब्ज, आम्लपित्त, अपचन अशा तक्रारी वाढतात. एक महिना चहा सोडल्यावर पचनक्रिया सुधारते आणि पोट हलकं वाटतं.
advertisement
8/10
दूध आणि साखर असलेली चहा कॅलरीने समृद्ध असते. दिवसातून अनेक कप घेतल्यास शरीरात शुगरचं प्रमाण वाढतं आणि वजन वाढतं. चहा बंद केल्यावर शरीरातील साखर कमी होते आणि वेट लॉसला मदत मिळते.
advertisement
9/10
हेल्थलाइनच्या माहितीनुसार, एक महिना चहा किंवा कॅफीन बंद केल्यावर रक्तदाब सुधारतो, हार्मोनल बॅलन्स राखला जातो, दात आणि त्वचेचं आरोग्य सुधारतं, मूड स्थिर राहतो आणि डोकेदुखी कमी होते. म्हणजेच, एक कप चहा कमी केली तरी शरीरावर परिणाम मोठा होऊ शकतो आणि तोही आरोग्यासाठी फायदेशीर
advertisement
10/10
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी त्याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Tea : एक महिना दूधाची चहा पिणं बंद केलं तर शरीरात काय बदल होतील? तज्ज्ञांचा धक्कादायक खुलासा